घोडावत विद्यापीठात ९ मे रोजी व्हॉइस कल्चर कार्यशाळा
अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील स्कूल ऑफ मीडियाच्या वतीने एक दिवसीय व्हॉइस कल्चर (आवाज जोपासना) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रोफेशनल व्हॉइस ट्रेेनर तुषार भद्रे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार 9 मे रोजी घोडावत विद्यापीठात कार्यशाळा होईल अशी माहिती विभागाचे समन्वयक प्रा.जयप्रकाश पाटील यांनी दिली.शिक्षक, विद्यार्थी, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट,अभिनेते,गायक,निवेदक, आरजे, युट्युबर्स यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या कार्यशाळेत कोणीही सहभागी होऊ शकते.बारावीनंतर च्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा मोफत असणार आहे.
नाट्य लेखक दिग्दर्शक अभिनेते तुषार भद्रे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.गेल्या 48 वर्षांपासून आवाज कार्यशाळेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. यासाठी नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी 9834929199 संपर्क साधावा.या कार्यशाळेसाठी अध्यक्ष संजय घोडावत,विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले,कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डीन संजय इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.