सौ. माधुरी राजू जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ४७ च्या अपक्ष उमेदवार सौ. माधुरी राजू जाधव यांचे प्रेशर कुकर हे चिन्ह असून त्यांचे नाव मशिनवर १६ नंबर वर आहे मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माधुरी राजू जाधव यांनी केले आहे. कोल्हापूरच्या विकासावर तत्परतेने संसदेत प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी मला मतदान करावे तसेच महागाई कमी करण्यासाठी मला मतदान कमी करावे आणि माझी उमेदवारी बलाढ्य धन दांडगे घराणेशाहीच्या विरोधात दिव्यांग विधवा परीतक्ता शेतकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तरुणांच्या हाताला बळकटी देण्यासाठी आहे.वारसा कार्याचा असतो विचारांचा असतो जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आणि जनतेला त्यांच्या समस्या,प्रश्न सोडविण्यासाठी मी लढाई करण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे तरी कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेने मला काम करण्याची संधी द्यावी असे मत सौ. माधुरी जाधव यांनी व्यक्त केले आहे.