महिला कर्तबगार व बुद्धिवान आहेत,अडथळे आहेत मात्र कोणत्याही कामात न थांबता त्यांनी उचित ध्येय गाठण्यासाठी पुढे चालले पाहिजे
आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून देत आहेत.त्या खूप पुढे महिला गेल्या आहेत.महिलांकडे प्रचंड बुद्धी आहे त्या कर्तबगार व बुद्धिवान आहेत.त्यामुळेच त्या काहीही करू शकतात याच जोरावर आत्मविश्वास निर्माण करून श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी काळानुरूप स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे.
त्या रोटरी क्लब गार्गीजच्या २०२४ च्या अध्यक्षा आहेत. तर एस. एन घाडगे अँड सन्सची डीलरशिप ३५ वर्षापासून त्या सांभाळत आहेत. एक महिला ही डीलरशिप सांभाळत आहे हे समाजाच्या दृष्टीने महिलांसाठी उत्तम उदाहरण आहे. त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत उत्तमपणे ही डीलरशिप सांभाळत असून आज ७२ वर्ष असणाऱ्या कल्पना घाटगे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन्सची उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे पदवी घेतली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी कंपनीत १९७४ साली ई. सी. आय एल कंपनीत त्यांनी नोकरी केली आहे. संगणक तयार करणारी ही कंपनी होती.नोकरी करत असताना सुरुवातीचा काळ त्यांनी हैदराबाद येथे घालविला आहे. त्यामुळे संगणक सुरू झाला त्यावेळी संगणकाची त्यांना माहिती नोकरीच्या निमित्ताने मिळाली. कोल्हापूरच्या के. आय. टी कॉलेजमध्येही सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना इले्ट्रॉनिक्स आणि टेली कम्यूनिकेशन विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला खूप आवडते. स्वतःचे ज्ञान त्यांना द्यायला आवडते त्यामुळे जोपर्यंत आपण स्वतः शिकत नाही तोपर्यंत दुसऱ्याला काहीच देऊ शकत नाही शिकवू शकत नाही असे त्यांना वाटते.संगणकाची जुने तंत्रज्ञान त्यांनी अवगत केले आहे. संगणकाच्या सुरुवातीनंतर आता मोबाईलचा काळ आलेला आहे हा काळ आणखी पुढे जाणार आहे त्यामुळे समाजाला जे पाहिजे आहे जे बदलत आहे त्यानुसार धावले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना मंदिरे पाहून अभ्यास करायला खूप आवडते त्यासाठीच त्यांनी अकरा मारुती चे दर्शन अभ्यास पूर्ण केले आहे. लवकरच स्वतःचे पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत त्या आहेत.१९७६ ला लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी सुपारीच्या रूपात गणेशाची पूजा केली होती की आज तागायत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने परंपरा चालू ठेवलेली आहे. माझ्या घरच्यांनी मला कायमच सहकार्य केले आहे. म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. समाजकार्य करत आहे.असे त्यांनी म्हंटले आहे. समाजाची परिस्थिती खूपच बदलत चाललेली आहे त्यामुळे महिलांनी स्वतःबरोबर जगायला शिकले पाहिजे. रोजचा दिवस चांगलाच आहे असेच मी दररोज म्हणते.त्याच पद्धतीने समाजातील सर्व स्त्रियांनी स्वतःला शोधून स्वतःबरोबरच जगायला शिकले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही कायम प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवून आपल्यामध्ये काहीतरी आहे आपण करू शकतो ही भावना समोर ठेवून महिलांनी आणखी पुढे जावे तिच्यावर खूपच जबाबदाऱ्या आहेत ती पेलतच पुढे गेली आहे, जात आहे आणि आणखी जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
श्रीमती कल्पना दिलीप घाटगे.
अध्यक्षा.
रोटरी क्लब ऑफ गार्गिज
कोल्हापूर.