पर्यावरण जागृतीसाठी खडकाळ जागेवर “उषा”नर्सरी उभी करणाऱ्या कोल्हापुरातल्या रेणुका सप्रे
संपूर्ण कुटुंब व्यवसायाचा डोलारा सांभाळण्यात व्यस्त असताना आणि औद्योगिक वसाहतीतील इंचन् इंच जागेला लाखमोलाची किंमत येत असताना पर्यावरणाचा वाढता -हास रोखण्यासाठी आणि पर्यावरण जागृतीसाठी कोल्हापुरातल्या रेणुका सप्रे या महिलेने औद्योगिक वसाहतीतील खडकाळ जागेवर नर्सरी उभारण्याचा ध्यास घेतला आणि आपल्या सासू-सासऱ्यांसह घरच्यांची मदत घेऊन खडकाळ जागेवर नर्सरीच्या माध्यमातून नंदनवन फुलवले. बी.एस्सी. बॉटनी आणि डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनिंग झालेल्या रेणुका सप्रे यांनी आपल्या सासऱ्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन कसबा बावडा-शिये रस्त्यावरील शिरोली औद्योगिक वसाहतीतील रामनगरात असलेल्या खडकाळ जागेवर नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुळात औद्योगिक वसाहतीमध्ये आणि तेही दगडाच्या खाणी व क्रशर असलेल्या ठिकाणी नर्सरी सुरू करणे म्हणजे आगीशीच खेळण्याचा प्रकार होता; परंतु हे सगळे माहीत असूनही ज्या ठिकाणी पर्यावरणाचे जास्त प्रदूषण होत आहे, त्याच ठिकाणी ते रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याच चांगला प्रभाव होऊ शकतो हे ध्यानात घेऊन आठ वर्षांपूर्वी रेणुका सप्रे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने सुरू केलेल्या ‘उषा नर्सरी’तून पर्याारणाच्या रक्षणाची चळवळ चांगलीच रुजवली आहे. नर्सरी सुरू करताना कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण काही तरी ठोस करणे गरजेचे असल्याची जाणीव ठेवून या नर्सरीच्या माध्यमातून पर्यावरणाप्रती जागृतीचे काम करण्यास रेणुका सप्रे यांनी सुरवात केली. कोल्हापुरातील ग्रीन ग्रोज या संस्थेच्या माध्यमातून राजारामपुरीत हजारो रोपे लावली, तर रोटरी आणि इतर संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांत पुष्पगुच्छांना फाटा देऊन दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या रोपांचे वाटप केले.उद्योगधंद्यात रमणारे अख्खे कुटुंब, श्रीमंतीचा वारसा आणि सर्व सखसोयींची उपलब्धता असतानाही केवळ पर्यावरणाच्या रक्षणाचा वारसा घेऊन उषा नर्सरीच्या माध्यमातून काम करणाऱ्या रेणुका सप्रे यांनी आपल्या नर्सरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला हक्काचा रोजगार देण्याचे काम केले आहे. दररोज नर्सरीमध्ये येऊन नर्सरीतील रोपांची काळजी घेणाऱ्या रेणुका सप्रे यांनी या नर्सरीच्या माध्यमातून अनेक दुर्मिळ आणि औषधी रोपांची निर्मिती करून त्यांची ठिकठिकाणी लागवड करण्याची मोहीमही उघडली आहे.त्यात त्यांनी अनेक दुर्गम भागांचाही अभ्यास केला आहे. समाजात त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला असून त्यांचे हे काम वाखानण्याजोगे आहे. महिला सशक्तिकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे. ज्यामुळे महिलांना समाजातील सर्व क्षेत्रांत समानतेचा अधिकार मिळतो. महिलांना शिक्षण, आरोग्य, आणि आर्थिक स्वतंत्रता मिळवून समाजात सक्रिय भूमिका घ्यायला मदत होते.आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्विनी होत आहेत.प्रत्येक महिला ही यशस्वी पणे अपने घर व संसार सांभाळत असते.तिची जबाबदारी ती पेलत असते तिला खरी गरज आहे समजून घेण्याची.महिलांच्या मध्ये उपजतच असणाऱ्या मॅनेजमेंट स्किल्स आणि महिलांचा इमोशनल कोटा हे वाखानण्यासारखे आहेत आणि हा महिलांच्या मधील एक सकारात्मक भाग आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत.जागतिक महिला दिानिमित्त शुभेच्छा.
रेणुका सप्रे यांच्या कार्याला सलाम!!
सौ.रेणुका अजय सप्रे
माजी अध्यक्ष
रोटरी क्लब ऑफ गर्जिज,
सीआयआय इंडीयन वूमेन नेटवर्क.