सोशल माध्यमामुळे माहिती आणि ज्ञान मिळणे सोपे त्यामुळे महिलांनी वैद्यकिय तपासणी विषयीचे गैरसमज काढून टाकावेत
आता खूपच तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पूर्वीच्या कालावधीमध्ये महिलांना खूप मार्गदर्शन करावे लागत होते. आता मात्र इंटरनेट मोबाईल युट्युब अशा सोशल मीडियामुळे महिलांना घरबसल्या वेगवेगळे ज्ञान व माहिती प्राप्त होत आहे. त्याचा उपयोग करून ती पुढे जात आहे. त्याचबरोबर या ज्ञानातून तिला वैद्यकीय सल्लाही दिला जात आहे. आज पत्की हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही युट्युब वर आमचे सर्व म्हणणे व्हिडिओच्या रूपाने महिलांसाठी उपलब्ध केलेले आहेत त्याचा फायदा महिला वर्गाला निश्चितच होत आहे. मात्र अजूनही समाजामध्ये बऱ्याच महिलांना वैद्यकीय तपासणीचे गैरसमज आहेत या तपासणीच्या बाबत महिलांनी कोणताही किंतू मनात न ठेवता गैरसमज काढून टाकावेत आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय तपासणीला अधिक महत्त्व द्यावे असा मोलाचा सल्ला डॉ. उज्वला पत्की यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना दिलेला आहे. पत्की हॉस्पिटल नेहमीच महिला रुग्णांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना योग्य आरोग्याची माहिती व महत्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेत आलेले आहे. त्यामुळेच आजवर या हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आज महिला खूप पुढे गेलेल्या आहेत खूप हुशार झालेल्या आहेत त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळू लागली आहे मात्र या सर्वांमध्ये त्यांनी सकारात्मक विचार करून त्याला वैज्ञानिकतेची जोड दिली पाहिजे व तब्येतीकडे आहाराकडे आणि योग्य व्यायामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगून सौ पत्की यांनी महिलांना व्यायामाची आवड कमी होत चाललेली आहे. आहारामध्ये सकस जेवणाचा उपयोग योग्य करणे आवश्यक आहे. नवनवीन माहिती इंटरनेट सोशल मीडिया यामुळे त्यांना मिळत असल्याने त्यांचे जगणे सुकर होत चालले आहे.याचा उपयोग त्यांनी केला पाहिजे.आयुष्यमान वाढले आहे त्यामुळे त्यांनी सर्व जबाबदाऱ्या पार पडत असताना आपले आरोग्य व ध्येय या दोन्हीची सांगड घालून समाजामध्ये काम करत राहिले पाहिजे.पत्की हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रसुती आणि वंध्यत्व या विषयावर मार्गदर्शन केले जात आहे. महिलांना मोलाचा सल्ला दिला जात आहे. जन्म अवस्था किशोरावस्था प्रौढावस्था रजोनिवृत्ती या सर्वच वयांमध्ये महिलांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते लहान वयात असताना मुलींना योग्य संस्कार देणे आणि मुलींची योग्य काळजी घेणे त्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करणे याची जबाबदारी पालकांची असते.यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. लग्न अगोदर, प्रेग्नेंसी नंतर, रजो निवृत्ती व वृद्धापकाळ या सर्वच वेळी महिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतात या तक्रारींचे निराकरण आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्याचेही काम आम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून करतो आहे असे उज्वला पत्की यांनी सांगितले आहे. वैद्यकिय उपचारमुळे महिलांचे आयुष्यमान वाढले आहे.यात मात्र त्यांनी योग्य आहार व्यायाम विचार करून आपले आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. २९ फेब्रुवारी रोजी पत्की हॉस्पिटलमध्ये २५ वर्षांपूर्वी जन्म झालेली “आय.व्ही.एफ. बेबी” आता पत्की हॉस्पिटलमध्येच आई बनली आहे.१९९० च्या दशकामध्ये “आय.व्ही.एफ.” किंवा “टेस्ट ट्यूब बेबी” हे शब्द फक्त सामान्य लोकांनाच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ञांनासुध्दा पूर्ण माहिती नव्हते. वंध्यत्वावरील उपचार म्हणजे प्रथमिक औषधोपचार एवढीच मर्यादित संकल्पना त्या काळात रुजलेली होती. अशा काळामध्ये कोल्हापूरसारख्या निमशहरामध्ये आपले ज्ञान, संशोधन व कष्ट या बळावार डॉ. सतीश पत्की व डॉ. सौ उज्ज्वला पत्की यांनी “आय. व्ही.एफ.” तंत्रज्ञान सर्वप्रथम यशस्वी केले आणि कोल्हापूरच्या पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म १९९६ मध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये झाला. या नंतर अनेक महिलांवर यशस्वी उपचार होत आहेत.पत्की हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
सौ.उज्वला सतीश पत्की
पत्की हॉस्पीटल
कोल्हापूर.