लगोरी फाऊंडेशन ठरत आहे महिलांना आधार,कुकिंग,सांस्कृतिक कार्यक्रम, महाहादगा,स्नेहसंमेलन माध्यमातून महिलांना मिळाले व्यासपीठ
एखादे काम करायचे आणि इतरांना सांगायचे त्यांना पुढे आणायचे हे फारच अवघड काम आहे.मात्र हे अवघड काम कोल्हापूरमध्ये सौ.शुभांगी साखरे या आपल्या लगोरी फाऊंडेशन च्या माध्यमातून करत आहेत.अलीकडे महिला काम करू लागल्या आहेत त्यांना घरी तितकासा वेळ देता येत नाही.एखादा कार्यक्रम अथवा लग्न समारंभ असला की जेवणावळ आणि गारवा शिदोरी हे आलेच त्यासाठी या लगोरी फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी घरगुती पद्धतीचा गारवा,शिदोरी , पुरण पोळी, बनवून दिली जाते याचबरोबर महिलांच्या हाताला अनेक कामे देण्यात आली आहेत. ज्यात घरबसल्या विविध कामे म्हणजेच साबण, अत्तर, फिनेल बनविणे,इतर शिवणची कामे,पापडी,लोणची बनविण्याची कामे,डबे तयार करणे या माध्यमातून महिलांच्या हाताला काम दिले जात आहे.ज्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे.
शुभांगी साखरे या सात वर्षापासून फाउंडेशन चालवत असून नऊ वर्ष त्या काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत आहेत एक हजार महिलांना रोजगार मिळवून देण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून महिलांना स्वतः पैसे मिळविण्याचे साधन त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे त्यासाठी त्यांच्या या लगोरी फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असून त्यातून त्या पावले टाकत आहेत ज्यावेळी स्वतः महिलांच्याकडे पैसे येतील त्यावेळी त्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी पैसे खर्च करू शकतील त्यांना इतरांकडे पैसे मागण्यासाठी वेळ येणार नाही यासाठीच लगोरी फाउंडेशन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सबली करण्यासाठी निर्माण करण्यात आले असून या फाउंडेशनच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलन, शालेय मुलींना मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा,निबंध स्पर्धा,खाद्य महोत्सव,जनजागृती रॅली याचशिवाय वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम महाहादगा, झिम्मा फुगडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवून महिलांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात मदत करण्यात आली शिवाय यात्री निवास च्या माध्यमातून कोल्हापूरच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लगोरी फाउंडेशनने यात्री निवास मध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना कोल्हापूरचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाते. या फाउंडेशनच्या माध्यमातून एकमेकींना सहवास मिळवता यावा यासाठी प्रत्येकीला मैत्रीण दिली आहे.मायेची फुंकर घालून दिली आहे. जुन्या पद्धती लोक पावत चाललेल्या आहेत त्या जुन्या पद्धती पुढे आणण्याचे काम फाउंडेशन मार्फत केले जात आहे महिलांना उभे करण्याचे काम या फाउंडेशनच्या माध्यमातून गेले सात वर्षापासून होत असून महिलांना अनेक संकटे आहेत आता त्या त्यावर मात करू लागल्या आहेत. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहण्याची शिकवण देत महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण केले जात आहे.
सौ.शुभांगी राजेंद्र साखरे.
लगोरी फाऊंडेशन अध्यक्ष
काँग्रेस स्वयंरोगार जिल्हा उपाध्यक्ष
कोल्हापूर.