पुणे पदवीधरची उमेदवारी देऊन शरद पवारसाहेब माझ्या निष्ठेला न्याय देतील,पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून प्रताप उर्फ भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज भरला
पुणे/प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मला देऊन आमचे नेते शरद पवारसाहेब माझ्या निष्ठेला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास केडीसीसी बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने यांनी व्यक्त केला.
आज पुणे येथे विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक, सिनेट सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदार स उमेदवारी अर्ज भरला.
राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील म्हणाले, देशाचे नेते शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विचारांने काम करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांना शरद पवारसाहेब निश्चितच न्याय देतील असा विश्वास आहे.
प्रताप उर्फ भैय्या बाबा म्हणाले, समाजकारण आणि शैक्षणिक कार्याचा वारसा सक्षमपणे पुढे चलवित गेल्या ४० वर्षांपासून समांतर काँग्रेस पक्ष ते आजतागायत संघटनेसह सामाजिक कार्यात व सर्व घटकांना न्याय देत नेहमी अग्रेसर राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी मी नेहमी प्रयत्न करत आलो आहे. यांची नोंद घेऊन देशाचे नेते, ज्यांनी महाराष्ट्र घडविला असे आदरणीय शरद पवारसाहेब निश्चितच मला न्याय देतील.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य युवराज (बापू) पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, कोल्हापूर शहर अध्यक्ष आर के पोवार, प्रदेश सरचिटणीस आदिल फरास, माजी स्थायी सभापती राजेश लाटकर, सरचिटणीस अनिल साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर जिल्हा अध्यक्ष अनिल घाटगे, केडीसीसी बँक संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँक संचालक असिफ फरास, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवानंद माळी, प्राथमिक जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष जी एस पाटील, पदवीधर शिक्षक संघटनेचे व जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य सुकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश तोडकर, संभाजी ब्रिगेड सदस्य व पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, कागल तालुका संघाचे राजू माने , कागल शहराध्यक्ष संजय चितारी, कागल तालुका युवक माजी अध्यक्ष विकास पाटील, कागल तालुका युवक अध्यक्ष निलेश शिंदे, सरपंच मयुर आवळेकर, कागल शहर उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी नगराध्यक्ष संजय ठाणेकर, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक सतीश घाडगे, नगरसेवक आनंदा पसारे, नगरसेवक बाबासाहेब नाईक, नगरसेवक विवेक लोटे, नगरसेवक प्रवीण काळबर, कागल शहर युवक अध्यक्ष सागर गुरव, सिनेट सदस्य मधुकर पाटील, माजी सरपंच दत्ता पाटील- केनवडेकर, माजी सरपंच रंगराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, गंगाराम शेवडे, संजय फराकटे, सतीश पोवार, सुनिल माने, मेघा वाघमारे, सिनेट सदस्य श्री. राजपूत , सिनेट सदस्य श्री. घाळीआदी मान्यवर उपस्थित होते.