चकोते ग्रुप’च्या अद्ययावत प्रकल्पाचे ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी भव्य उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या आजवरच्या वाटचालीतील सोनेरी पाऊल म्हणजेच नूतन अद्ययावत प्रकल्प. या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार (दि. २८) रोजी १२.३० वाजता नांदणी येथील स्वाभिमानी फूड क्लस्टरमध्ये संपन्न होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांनी दिली आहे.
याविषयी बोलताना चेअरमन चकोते म्हणाले, गुणवत्ता नियंत्रणसाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य असल्याचे आपल्याला जाणवले आणि या प्रकल्पाची बांधणी झाली. अतिशय प्रतिकूल अशा कोरोना काळात देखील प्रत्येक टप्प्यावर विविध अडचणींना मात करत चकोते ग्रुपने या प्रकल्पाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सदर प्रकल्प नांदणी येथील स्वाभिमानी फूड पार्कमधील १३ एकर जागेमध्ये आणि अडीच लाख चौरस फूट सुपर बिल्ट अप एरियामध्ये हा प्रकल्प आकारास आला आहे. स्वच्छतेसाठी लागणारे अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर, कमीत कमी मानवी इंटरफेस स्वयंचलित मशीन्सनी युक्त असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
या सोहळ्यासाठी खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, माजी खा. संजयकाका पाटील, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आ.हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ.विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, आ. पी. एन. पाटील, आ. राजूबाबा आवळे,माजी खा. राजू शेट्टी, माजी आ.सुरेश हाळवणकर, एच. के. बत्रा, माननीय आजी-माजी खा. आमंदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवामधील सर्व वितरक,रिटेलर्स, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून पंधरा हजार लोकांची सोय केली जाणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी भव्य शामियाना व सर्व सुविधांसह बैठक व्यवस्था केली आहे. प्रमुख पाहुण्यांच्या आगमनापर्यंत करमणुकीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितांना या दिवशी काही नियोजित काळासाठी व्हीजिटर गॅलरीमधून या प्रकल्पाला भेट देता येणार असल्याचे चेअरमन चकोते यांनी सांगितले आहे.