अंतरंग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता स्थूलता निवारणाचे उपचार होणार – डॉ. विवेकानंद कुलकर्णी
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या १५-२० वर्षात मानवी जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. व्यायामाचा अभाव
बैठे काम, फास्ट फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा म्हणजेच स्थूलता वाढत आहे. कॅलरी किंवा ऊर्जेने
भरगच्च असलेल्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. पूर्वी पालेभाजी भाकरी आणि डाळ असला
आहार घेतला जायचा. तसेच वाहनांचा वापर, कंप्युटरवर बसून काम यामुळे शारीरिक श्रम कमी झाले आहेत. अशा जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. हे लठ्ठपणाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला व त्यावरील उपचार पद्धती व मार्गदर्शन मिळावे यासाठी अंतरंग हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक अँड मेटॅबॉलिक सर्जरी विभाग सुरू केला असल्याची माहिती डॉ विवेकानंद कुलकर्णी,व डॉ. संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार सध्या जगात १०० कोटी पेक्षा जास्ती लोकांमध्ये लट्ठपणा दिसून येतो. तसेच सन २०३० पर्यंत जगातील ६०% लोक स्थूलताबाधित होणार आहेत.
लठ्ठपणा ही फक्त शारीरिक विकृती नसून ते अनेक आजारांचे मूळ आहे. मधुमेह, रक्तातील
वाढलेले कोलेस्टेरॉल / चरबीचे प्रमाण, रक्तदाब, हृदयाचे विकार, फॅटी लिव्हरमुळे होणारे लिव्हरचे
आजार, धाप आणि श्वसनाचे आजार, स्त्रियांमधील वंध्यत्व, गुडघेदुखी या सगळ्या आजारांच्या
मुळाशी लठ्ठपणा आहे. उंची आणि वजनानुसार बी. एम. आय. या कोष्टकाद्वारे लठ्ठपणा मोजला जातो
आणि त्यानुसार त्याचे मापन केले जाते.
लट्ठपणाचे मोजमाप :-
बी. एम. आय.
१८ ते २५ योग्य वजन
२५ ते ३० – जास्तीचे वजन
३० ते ३५ – लठ्ठपणा
३५ च्या पुढे अतिलठ्ठ
वरील कोष्टकानुसार लठपणा कमी असूनसुद्धा भारतीयांमध्ये जास्ती प्रमाणात आजार दिसून
येतात. त्यासाठी भारतीयांनी २३५ पेक्षा कमी बी. एम. आय. ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे लट्ठपणाचे
आजार होणार नाहीत. लठपणा येऊ नये, यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणे, नियामित
व्यायाम आणि नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. लठ्ठपणा खूप असल्यास,वजन कमी करण्यासाठी विशेष उपचार घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटल येथे बॅरियट्रिक अँड मेटाबॉलिक सर्जरी या विभागाची सुरुवात केली आहे. या विभागात योग्य आहार व्यायाम आणि वजन कमी करण्यासाठी योग्य तो औषधांचा सल्ला दिला जाणार आहे.लॅप्रोस्कॉपीने पचनसंस्थेत बदल करून बऱ्याच प्रमाणात वजन कमी करता येते.वजन नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष आहारतज्ञ मानसतज्ञाशी संपर्कात राहून, सल्ला घेण्याची आवश्यकता असते.
अंतरंग हॉस्पिटलमध्ये डॉ. आदित्य कुलकर्णी – पोटविकार आणि एन्डोस्कोपी तज्ञ, डॉ सौरभ लॅप्रोस्कॉपी तज्ञ, शुभांगी जोशी-विशेष आहारतज्ञ, सोनल जोशी-मानस तज्ञ असा परिपूर्ण डॉ विवेकानंद कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली कार्यरत आहे.