कर्नाटक सरकारच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले .
कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटक सरकारच्या विरोधात कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन शाहू समाधी स्थळ बुधवार पेठ येथे करण्यात आले . बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर- भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा नारा दुमदुमला. “नही चलेगी नही चलेगी-दादागिरी नही चलेगी”असा इशारा कर्नाटक सरकारला दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह विविध संस्था, संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. महापुरुषांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला
कर्नाटकच्या सरकारकडून सीमावासियांवर होत असलेल्या अन्याय -अत्याचार विरोधात महाविकास आघाडीने शनिवारी (दहा डिसेंबर) कोल्हापुरात आंदोलन पुकारले होते. राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे आंदोलन झाले. याप्रसंगी विविध नेत्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नेते मंडळीचा आंदोलनस्थळी समाचार घेण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणीकर, दिगंबर पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. “रहेंगे तो महाराष्ट्र मे -नही तो जेल मे ” अशा घोषणा देत एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमा लढ्याचा आवाज बुलंद केला. “बेळगाव आमच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोक्यावर, ”बेळगाव-निपाणी-कारवार-बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. घोषणा देत शिवसेना ठाकरे गट दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, अवधूत साळोखे, मनजित माने, महिला आघाडीच्या स्मिता मांडरे, प्रतिज्ञा उत्तुरे , प्रीती क्षीरसागर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत आंदोलनस्थळी दाखल झाले.
आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी महापौर आर.के. पोवार, राष्ट्रवादीचे व्ही.बी. पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी गुलाबराव घोरपडे, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, अस्लम सयद, माजी उपमहापौर विक्रम जरग, संजय मोहिते, काँग्रेसचे शहराध्यक्ष व स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, आदिल फरास, विनायक साळोखे, प्रकाश नाईकनवरे,सुभाष बुचडे भूपाल शेटे, दत्ता टिपुगडे, अशोक भंडारे, अनिल कदम, रमेश पुरेकर,काका पाटील, सुरेश ढोणुक्षे, सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा देवकर, प्राचार्य टी एस पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, विनायक फाळके, दुर्वास कदम, अशोक पोवार,अमर समर्थ, सुलोचना नायकवडी, भारती पोवार, चंदा बेलेकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सुनील देसाई, संजय पवार वाईकर, दीपक थोरात, दिग्विजय मगदूम आदिंचा सहभाग होता. प्रारंभीर दिलीप सावंत यांनी पोवाडा सादर केला.