Sunday, December 22, 2024
Home ताज्या रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्यावतीने १६ ते १८ डिसेंबर रोजी...

रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्यावतीने १६ ते १८ डिसेंबर रोजी “रॉयल रोडिओ” स्पर्धेचे आयोजन

रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्यावतीने १६ ते १८ डिसेंबर रोजी “रॉयल रोडिओ” स्पर्धेचे आयोजन

देशभरातील ५०० हुन अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार

कोल्हापूर/ प्रतिनिधी कोल्हापूर येथील रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या वतीने येत्या १६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसासाठी भारतातील सर्वात मोठी व सुप्रसिद्ध असणाऱ्या “रॉयल रोडिओ”या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणी वेगवेगळ्या मोटर बाईकचे एक्सपो प्रदर्शनही आयोजित केले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष जयदीप पवार, सदस्य अभिजीत काशिद व मोहीतेज रेसिंग अकॅडेमीचे संचालक अभिषेक मोहीते आणि ध्रुव मोहिते,राजीव लिंग्रस यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. एकूण ५०० हुन अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात येत आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये १६ डिसेंबर रोजी ऑटो क्रॉस, १७ डिसेंबर रोजी एमटीबी सायकल सुपर क्रॉस आणि १८ डिसेंबर रोजी मोटरसायकल सुपरक्राॅस रेसिंग अशा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.या सर्व स्पर्धा हुपरी सांगवडे रोडजवळील मोहितेज रेसिंग अकॅडेमी यांच्या ट्रॅक वर होणार आहेत.

१६ रोजी होणारी मोटरसायकल आणि स्कूटर ऑटो क्रॉस स्पर्धा ही सकाळी सुरू होणार आहे.आणि यात ९ वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धा होणार आहेत.८०० मीटरच्या ट्रॅक वर होणाऱ्या ही स्पर्धा असून मोटर सायकल, बाईक,स्कुटर(मोपेड)व प्रथमच ई व्हेईकल इलेक्ट्रॉनिक स्कूटर अशा गटामध्ये होणार आहे .बाईकच्या सीसी गटामध्ये ही स्पर्धा टाइमट्रायलवर पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या गो कारटिंग डांबरी ट्रॅकवर होणार आहेत.

१७ रोजी एम. टी. बी सुपर क्रॉस ही स्पर्धा होत आहे. भारतात केवळ आता ही स्पर्धा कोल्हापूरमध्ये सुपर क्रॉस ट्रॅकवर होत आहे. देशभरातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत आहेत एकूण २०० स्पर्धकांचा सहभाग असणारी ही स्पर्धा एकूण पाच वयोगटात होत आहे.एकूण ९०० मीटर अंतराच्या ऑफ रोड ट्रॅकवर ही स्पर्धा होत आहे.

स्पर्धेचे वयोगट
१४ वर्षाच्या आतील –
१७ वर्षाच्या आतील –
१८ ते ३० वयोगट –
३१ ते ४५ वयोगट –
४५ च्या वरील वयोगट
अशी ही स्पर्धा असणार आहे.

१८ डिसेंबर रोजी मोटरसायकल सुपर क्रॉस रेसिंगची स्पर्धा होणार आहे. वेगवेगळ्या २२ प्रकारच्या गटात ही स्पर्धा होणार असून बाईक मधील सर्व प्रकार यात असणार आहेत.

स्पर्धेसाठी संपर्क हा जयदीप पोवार ९५०३६०९९९९,योगेश पाटील ७२७६३०८००८ आणि संदीप माने ९४२०८९१००२ साधायचा आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा त्या त्या दिवशीच होणार आहे. या स्पर्धा मोफत पाहता येणार असून या पाहण्यासाठी सर्वांनी आवर्जून याठिकाणी भेट द्यावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला संदीप देसाई,उदय पाटील,वैभव बेळगावकर,योगेश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments