विरासत फौंडेशनच्यावतीने कोल्हापूर सिंगिंग आयडॉल
कोल्हापूर/प्रतिनिधी : संगीताची सुप्त इच्छा असणार्या हौशी व नवोदित गायकांना हक्काचे सांगीतिक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कोल्हापूरातील विरासत फाऊंडेशनच्यावतीने ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेच्या दोन फेऱ्या पार पडणार आहेत. प्राथमिक फेरी १७ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी ठिक १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे.यामध्ये १५ वर्षापुढील वयोगटातील हौशी स्पर्धकाने
प्राथमिक फेरीसाठी स्वत:च्या आवडीचे मराठी किंवा हिंदी गाणे कराओकेसहीत सादर करायचे आहे. १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. प्राथमिक फेरीचा निकाल त्याचदिवशी जाहीर करण्यात येतील.अंतीम फेरी रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वाद्यवृंदाबरोबर प्रत्यक्षात होणार आहे.प्रथम,द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १०,०००/-,७०००/-,५०००/-, दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना १०००/- अशी रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी विरासत फाऊंडेशन ९६६५५४९७९१ व तेजस ९११२००५९११ यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेमध्ये हौशी व नवोदित कलाकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विरासत फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे आहे.पत्रकार परिषदेला रणजित बुगले,केतकी जमदग्नी महाजन,तेजस अतिग्रे,प्रेषिता पुसाळकर,शिल्पा पुसाळकर,भक्ती गांधी,गिरीश बारटक्के,मीना पोतदार,संदीप ताशीलदार उपस्थित होते.