Sunday, July 14, 2024
Home ताज्या मी जवळून अनुभवलेला उद्योजक आमदार

मी जवळून अनुभवलेला उद्योजक आमदार

मी जवळून अनुभवलेला उद्योजक आमदार

१ डिसेंबर २०२१ हा दिवस व्यापार-उद्योग व सर्व कोल्हापूरच्या जनतेच्या दृष्टीने अत्यंत दु:खद दिवस. आण्णा आमच्यात राहीले नाहीत. आण्णा आमदार झाले नसते तर आज आमच्यात नक्कीच असते.
सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविणे, व्यापार-उद्योग करुन आपली लोकं मोठी झाली पाहीजेत अशी जिद्द त्यांच्यात होती. समोर आलेले प्रश्न कोणतेही असुदेत ते सुटले पाहीजेत अशी त्यांची नेहमी धडपड असायची. सर्वसामान्य लोकांची कामे करणे व लागेल त्यावेळी त्यांना स्वत:च्या खिशात हात घालून मदत करणे ही त्यांची सचोटी होती.
प्रायव्हेट हायस्कूल मधून दहावी पास झाले. शाळेच्या काळामध्ये सुट्टीमध्ये घरी न बसता फिरुन छोटा मोठा व्यवसाय करत असत. दिवाळी सुट्टीत सुवासीक तेल व साबणांच्या ऑर्डर्स घेऊन पुरवठा करत असत. आयटीआय पास झालेनंतर दोन लेथ मशिन स्वत: चालवत होते. मनात जिद्द होती मोठे उद्योजक बनण्याचे. हळुहळु व्याप्ती वाढत गेली व जाधव इंडस्ट्रीजच्या रुपाने वटवृक्षात रुपांतर झाले. त्यांची जिद्द, कामाची पध्दत पाहून त्यांना २०१५ साली चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारिणी मध्ये येण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली व कार्यकारिणी मध्ये आले व माझ्याबरोबर उपाध्यक्ष देखील झाले. चेंबरमध्ये आलेपासून रोज फोन करुन, भेटून फक्त व्यापार-उद्योगाच्या कामाबद्दल, त्यांच्या असलेल्या प्रश्नांबाबत चर्चा करायचे. त्यावेळी वीज दरवाढीचा प्रश्न मोठा होता. तो त्यांनी हाती घेतला. दहा हजाराहून अधिक व्यापारी-उद्योजक यांचा त्यावेळी मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व त्यांनी केले. अन्यायाविरुध्द लढण्याचे त्यांच्या रक्तातच होते. २०१९ च्या महापुरावेळी व्यापार-उद्योगांना शासनाची मदत मिळवून देणेसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करुन पहिल्यांदाच व्यापाऱ्यांसाठी १०० कोटी मंजूर करुन आणले.
आम्ही आण्णांना सारखे भेटत असो अथवा मिटींग वेळी आम्ही त्यांना आमदार म्हणून बोलवत असू व सारखे आमदारकी लढवायची आणि आमदार व्हायचेच असे सांगत असू. आमदारकीची निवडणूक जाहीर झाली. पण घरी दोन भाजपचे नगरसेवक असल्याने भाजपच्या तिकीटासाठी प्रयत्न केले. पण ते मिळणार नाही असे लक्षात आले त्यावेळी आम्ही त्यांना काँग्रेसचे तिकीट घ्या आपण निवडून येऊ अशी खात्री देत असू. पण माला काँग्रेसचे तिकीट कोण देणार असे सांगून आपण अपक्ष लढूया असे नेहमी म्हणायचे. आम्ही त्यांना काँग्रेसचेच तिकीट घेऊन विजयाची खात्री पटवून दिली. त्यानंतर तिकीटासाठी धडपड सुरु झाली. आनंद माने यांच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांची भेट घ्यायचे ठरले. दरम्यानच्या काळात माजी नगरसेवक दिलीप शेटे यांनी चंद्रकांत जाधव यांना बोलवून घ्या मला त्यांच्याशी निवडणूकीसंदर्भात बोलायचे आहे असा मला निरोप आला. त्यांच्यासोबत देखील मिटींग केली. दुसऱ्या दिवशी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भेटावे लागेल मी त्यांच्याशी बोलतो तुम्ही त्यांना भेटा अशी सुचना केली. आम्ही दुसऱ्या दिवशी संगमनेरला जावून बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. पंधरा मिनिटाच्या भेटीमध्ये भेटीच्या अहवालानुसार आम्हांला तिकीट मिळणार याची खात्री होती. आम्ही कामाला लागलो. आण्णांचा मुत्सुद्दीपणाव अचुक नियोजन करण्याची पध्दत सर्व संघटनेचे पदाधिकारी, सभासद, व्यापारी-उद्योजक यांचे बरोबर असलेल्या मैत्रीचे संबंध स्वत: त्यांच्याकडे जावून त्यांचेसोबत चर्चा करुन माझा प्रचार करावा लागेल असे सांगून त्याचा पाठपुरावा ते करत असत. सर्वांना एकत्र करण्याचे कौशल्य व त्याचा पाठपुरावा करणे यामध्ये त्यांची सचोटी होती. प्रत्येकाने दहा घरामध्ये जावून त्याचे मतात परिवर्तन करायचे असे त्या सांगत असे व त्याचा पाठपुरावा घेतल्यामुळे आण्णांचा विजय सहज शक्य झाला. निवडणूकीच्या काळामध्ये ते कधीही नाराज झालेले दिसत नव्हते. निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसा त्यांचा उत्साह वाढत गेला. त्यामुळे या उत्साही वातावरणात विजय संपादन केलेले समजले देखील नाही.
आण्णा आमदार झालेनंतर त्यांचेबरोबर मुंबईत मंत्रालयातील कामासाठी मी जात असे. जाताना सर्व विभागातील सर्व मंत्र्यांची निवेदने घेणे. सर्व मंत्र्यांची वेळ घेणे. त्यांचेसोबत त्यांच्या संबंधीत प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करणे व चर्चेचे रुपांतर निर्णयात करुन घेण्याची त्यांची सचोटी होती. त्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय मांडलेला प्रश्न सुटला पाहीजे. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व लेखी प्रश्न सभासभागृहात मांडणेसाठी पाठविले होते. पण दोन प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना मिळाली. याच अधिवेशनामध्ये कोरोना विषाणु बद्दल चर्चा सुरु होती व २५ मार्च २०२० पासून कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक व जीवनावश्यक सो़डून सर्व व्यापार-उद्योग व्यवहार बंद केले.
मी त्यांच्यासोबत रोज फिरत असे. त्यावेळी ते सामान्य लोकांना त्रास होणार नाही असे नियोजन करा असे ते सांगत असत. कोल्हापूर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त नसल्याने व्यापार-उद्योग सुरु झाला पाहीजे अशी त्यांची जिल्हा प्रशासनाकडे सारखी मागणी असत असे. अशावेळी जिल्हा प्रशासन त्यांना लवकर तोडगा काढू असे म्हणायचे. पण आण्णा हे स्वत: व्यापारी बुध्दीचे उद्योजक असल्यामुळे त्यांना व्यापार-उद्योग बंद ठेवल्यामुळे किती अडचणी येऊ शकतात याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांचा जिल्हा प्रशासन कडे उद्योग-व्यापार सुरु करण्यासाठी कायम आग्रह असायचा व त्यांनी त्या पध्दतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उद्योग ३ एप्रिल २०२० पासून सुरु करण्याचे परिपत्रक काढून घेतले. उद्योग सुरु झाले, आता व्यापार सुरु व्हायला पाहीजे अशी भूमिका त्यांनी जिल्हाधिकारी व आयुक्त यांचेसोबत मिटींग करुन मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आयुक्त यांना व्यापार सुरु करणेसंदर्भात अधिकार दिले आहेत. त्यांनी ताबडतोब महापालिकेत आयुक्तांसोबत मिटींग घेतली व त्यांना सर्व व्यापाऱ्यांची जबाबदारी मी घेतो व्यापार ताबडतोब सुरु करुन द्या असे सांगितले. आयुक्तांनी त्याला मान्यता देऊन ५ एप्रिल २०२० पासून सम-विषम तारखेप्रमाणे व्यापार सुरु करण्याचा कोणत्याही परिपत्रकाविना प्रायोगिक तत्वावर व्यापार सुरु करुन घेतला. ते स्वत: बाजारपेठेत फिरुन व्यापाऱ्यांना शिस्त पाळा असे ठणकावून सांगत असत आणि हा व्यापार असाच कोणतेही परिपत्रक नसताना फक्त त्यांनी घेतलेल्या जबाबदारीवर पुढे चालू राहीला.
देशामध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन चालू झाला त्यावेळी उद्योग-व्यापार सुरु करण्याचे शासनाचे नियम बदलले होते. व्यापार बंद झाला पण उद्योग त्यांनी कधीही बंद पडू दिला नाही. पण दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये व्यापार सुरु करण्यासाठी शासनाचे नियम वेगळे असल्यामुळे त्यांनी आम्हांला सोबत घेऊन मंत्रालय गाठले. त्यावेळचे पालकमंत्री सतेज पाटील यांना घेऊन मुख्यमंत्यांग सोबत चर्चा केली. त्यावेळी देखील मी सर्व व्यापाऱ्यांची जबाबदारी घेतो, व्यापार उघडणेसाठी परवानगी द्या असे सांगितले. त्यांनी संबंधीत खात्याच्या सचिवांना भेटून मला प्रस्ताव पाठवण्याची सुचना केली. त्यादिवशी मुक्काम करुन दुसरे दिवशी त्या संबंधित सचिवांबरोबर मिटींग करुन व्यापार उघडण्यास जरुर असलेला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून करुन घेतला. तो राज्याला पाठवून व्यापार सुरु करण्यापर्यंत त्याचा पाठपुरावा केला व सुरु करुन दिला. कराड मध्ये सर्व मंत्र्यांची आढावा बैठक होती. त्या बैठकीला राष्ट्रवादीचे देशाचे नेते शरद पवार देखील हजर होते. आण्णा आम्हां सर्व संघटनेच्या अध्यक्षांना घेऊन वीज दरवाढी संदर्भात कराडला भेटायला घेऊन गेले. आढावा बैठक संपलेनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरी जाऊन शरद पवार यांची वीज दरवाढी संदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शरद पवार यांनी दोन दिवसांनी मला मुंबईत भेटण्याची सुचना केली. आम्ही सर्व संघटनेचे अध्यक्ष मुंबईला शरद पवार यांना भेटलो. त्यांनी उर्जामंत्र्यांना फोन करुन संबंधीत प्रश्नाबाबत तोडगा काढण्याची सुचना केली. उर्जामंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयात मिटींग सुरु झाली. मिटींग मध्ये आण्णांची उर्जामंत्री ऐकण्यास तयार नव्हते त्यावेळी त्यांनी प्रश्न सुटणार नसेल तर माझी आमदारकी काय उपयोगाची मी ताबडतोब आमदारकीचा राजीनामा देतो असे खडसावले. त्यानंतर उर्जामंत्र्यांनी त्यांचे सर्व प्रश्न समजून घेण्यास सुरुवात केली. आण्णांची अशी शेकडो उदाहरणे आहेत.आण्णांचे आमच्यातून जाणे व्यापार-उद्योगाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यापार-उद्योग पोरका झालेला आहे. पण आण्णांचे अपुरे असलेले स्वप्न व सर्व प्रश्न तसेच त्यांनी दाखविलेल्या कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन पूर्ण करुन घेणे हीच त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणास आदरांजली असेल.

श्री. संजय शेटे.
अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments