जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिव समर्थतफेँ शालेय मुलांचे आरोग्य शिबिर संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ईस्तर्न पॅटर्न कनान नगर येथील प्राथमीक शाळेत मुलांच्या साठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी ४० मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. या मुलांची आरोग्य तपासणी १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.त्यानंतर जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थचे सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे यांनी मुलांच्या आहारा बाबतीत लक्ष देऊन त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी भरपूर कष्ट घेतले आणि घेत आहेत. तसेच प्रत्येक महिन्याला गृप तफेँ शाळेला भेट देऊन पौष्टिक खाऊ वाटप केले जाते. जेणेकरून कुपोषित मुलांच्या वजना मध्ये वाढ होऊन त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी रहावे.यासाठी गृप मधील सगळ्या सदस्यांचा मोलाचा सहभाग आहे.