बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा व शहर बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, मा.परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक श्रीमती पुजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा कामते, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे, शारदा भांदिगरे, शाहीन काझी, मीनाताई पोतदार, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, अमोल भास्कर, रिक्षा सेना जिल्हा समन्वयक विक्रम पवार, शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, फेरीवाले शहरप्रमुख अर्जुन आंबी, शिवसेना उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर, सुनील माने, कपिल नाळे, योगेश चौगले, अभिषेक काशीद, धनाजी कारंडे, मंदार तपकिरे, दीपक चव्हाण, निलेश हंकारे, विभागप्रमुख मुन्ना तोरस्कर, रणजीत मंडलिक, प्रदीप मोहिते, बंडा माने, श्रीकांत मंडलिक, राजू काझी, सुजय संकपाळ, किरण पाटील, सचिन क्षीरसागर, रणजीत सासणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.