अबब कोल्हापूर पोलिस मूख्यालयातील पोलिस नाईक जाॅन वसंत तिवङे यानेच मागितली १ कोटी रुपयांची लाच शाहूपूरी पोलिसात गून्हा दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी : देहूगाव ( ता. हवेली) जिल्हा पूणे येथील तक्रारदार यांच्या शेतजमिनीचे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पूणे””खंङपीठ पूणे येथील दाव्याचा निकाल तेथील प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी यांना सांगून त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदार यानां तूमच्या विरोधी पार्टीने एक कोटी रूपये देण्यास तयार आहे.असे म्हणून लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कोल्हापूर पोलिस मूख्यालयातील पोलिस नाईक जाॅन वसंत तिवङे रा. कोरोची ता. हातकणंगले याच्यावर शाहूपूरी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याचे काम सूरू असून तो फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकङे लेखी तक्रार केली होती. त्यानूसार पङताळणी केली आसता 22/3/2022 रोजी कोल्हापूर येथील एस.टी. स्टँङ जवळील एका हाॅटेलात तक्रारदार यांच्याकङे त्यांच्या जमीनीबाबत एम.आर.टी र्कोंशिल पूणे येथील दाव्याचा निकाल तेथील प्रशासकीय सदस्याला सांगून त्यांच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी तक्रारदार चव्हाण यांच्याविरूद्ध पार्टीने एक कोटी रूपयाची आॅफर दिली असून तक्रारदार यानां त्यांच्या घरच्यांशी चर्चा करून विरोधी पार्टीच्या आॅफर प्रमाणे करा असे म्हणून त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले. सध्या पोलिस नाईक जाॅन तिवङे फरार झाला असल्याचे सूत्राकङून समझते.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना विकास माने”सूनिल घोसाळकर पो. काँ मयूर देसाई रूपेश माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.