रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका): जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण २९ नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी सन २०२२ सालचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. इच्छुक संस्थांनी, महिला बचतगटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कागदपत्रांसह दि. ४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.रास्तभाव दुकान व गावाचे/क्षेत्राची नावे
पुढीलप्रमाणे-
कोल्हापूर शहर- शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजेंद्र नगर व रविवार पेठ. इचलकरंजी शहर- आर.के.नगर, इचलकरंजी. करवीर तालुका -मुडशिंगी, निगवे खालसा, नंदगाव, उजळाईवाडी व कोगील खुर्द. भुदरगड तालुका-सालपेवाडी व बिद्री पेठ शिवापूर. हातकणंगले तालुका- पारगाव, यळगुड व कोरोची. राधानगरी तालुका-सरवडे. कागल तालुका- कागल शहर. चंदगड तालुका- इसापूर, बेळेभाट, तडशिनहाळ व दाटे. शाहूवाडी तालुका- आकूर्ले, मोळावडे, टेकोली व भेडसगाव. गगनबावडा तालुका- अणदूर व तळीये बुद्रुक. पन्हाळा तालुका- पोर्ले तर्फ बोरगाव व आजरा तालुका- इटे याप्रमाणे. अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालय व शहर पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.