Saturday, December 21, 2024
Home ताज्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील वास्तू संग्राहलय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले

लक्ष्मी विलास पॅलेस येथील वास्तू संग्राहलय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले

लक्ष्मी विलास पॅलेस येथील वास्तू संग्राहलय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले

वास्तू संग्राहलयास भेट देणारी व्यक्ती सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर दि.२६ (जिमाका) :- लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले वास्तू संग्रहालय आजपासून लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येत असून या संग्राहलयास भेट देणारी प्रत्येक व्यक्ती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केला.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महजाराज यांच्या प्रतिमेतस पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व इंद्रजित सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, शाहू महाराजांचा समतेचा विचार लोकांसमोर जावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शाहू राजांचा समतेचा आणि सर्वधर्म समभाव हा विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी स्मृती शताब्दी वर्षात वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असून हे विचार भावी पिढीला प्रेरणा देणारे आहेत. वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास नव्या पिढीसमोर नक्कीच जाईल. या वास्तु संग्राहलयाच्या पुढच्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

शाहू राजांचे समाजाभिमुख काम प्रेरणा देणारे, ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ

राजर्षी शाहू महाराजांच्या १४८ जयंती निमित्त शुभेच्छा देवून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले परिर्वतन व समतेसाठी केलेले काम हिमालयासारखे आहे. सामान्यांच्या हितासाठी स्वत:चा खजिना रिकामा करणाऱ्या राजाने समतेचा कामाचा पाया रचला. गोरगरीब, सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असून त्यांनी घेतलेल्या समाजाभिमुख निर्णयाचा वसा पुढे नेण्याचे काम राज्य शासनमार्फत होत आहे.लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या पुढच्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी यावेळ केली.तदनंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व मान्यवरांनी वास्तू संग्राहलयाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments