Monday, July 15, 2024
Home ताज्या मनपा.नेहरुनगर शाळेत विद्यार्थी आलेत लंडन बसने   नवागतांचे स्वागत

मनपा.नेहरुनगर शाळेत विद्यार्थी आलेत लंडन बसने   नवागतांचे स्वागत

मनपा.नेहरुनगर शाळेत विद्यार्थी आलेत लंडन बसने   नवागतांचे स्वागत

कोल्हापूर/प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा आज पहिला दिवस. पहिल्या दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते.      मनपा.नेहरुनगर शाळेत दरवर्षी वेगळी थीम वापरुन नवागतांचे स्वागत केले जाते.यावेळी मुलांची आवडती बस म्हणजे लंडन बस या बसने शाळेत आलेल्या मुलांचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले..यावेळी १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला.                                                              नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.तसेच महानगरपालिका शाळास्तरावर राबविला जाणार असलेला मी इंग्रजी बोलणार व गणित झाले सोपे या उपक्रमांच्या हस्तपुस्तिकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले.यावेळी शिक्षक निरीक्षक मा.रवींद्र चौगले,प्रशासनाधिकारी मा.डी.सी.कुंभार,सामाजिक कार्यकर्ते व माजी सभागृह नेता मा.दिलीप भुर्के,माजी शिक्षण सभापती मा.पद्मजा भुर्के मॕडम ,व्यवस्थापन समिती सदस्य डाॕ.विनायक शिंदे,महेश सावंत,मुख्याध्यापक शहाजी घोरपडे सर्व शिक्षक ,सेवक,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments