राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड.
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशन व सावली केअर सेंटर वतीने राजेंद्र नगर येथील मोरेवाडी येथील माय सावली येथे चालू असलेल्या जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत इक्बाल बागवान ने गतवेळेचा विजेता रोहित चौगुले याचा अटीतटीच्या लढतीत 12 /16 , 17/11, 18/11 असा सेटने पराभव करून प्रथमच विजेतेपद मिळविले .वरीष्ठ गटात सुनील दरवान ने शिवशंकर भस्मे याचा पराभव केला.इक्बाल बागवान अंतिम विजेता. उपांत्य फेरीत चुरशीच्या लढती उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात रोहित चौगुले व सुनील कांबळे यांच्या मध्ये झालेल्या लढतीत गतविजेत्या रोहित ने सुरूवातीपासून पासूनच आक्रमक खेळ करीत सुंदर असे कट मारत पहिला गेम 22 /13 असा घेतला दुसऱ्या गेममध्ये सुनील ने आपला खेळ उंचावत अप्रतिम असे समोरील पिसेस अलगद घेऊन,व समोरील खेळाडू ला चुका करणेस भाग पाडून दुसरा सेट सुनील ने 25 /4असा घेऊन बरोबरी केली.तिसऱ्या गेममध्ये रोहित स्वतः ला सावरत अतिशय सुरेख व सुंदर असे अप्रतिम कट,मारत तिसरा गेम24 /7असा लिलया घेऊन फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला दुसरा उपांत्य फेरी सामना कोल्हापूर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कॅरम खेळाने अनेक उच्च खेळाडूंना धक्कादायक पराभव करून आपल्या नांवाचा दबदबा निर्माण करणारा शांत स्वभावाचा व अनुभवी खेळाडू.अमोल होगाडे इचलकरंजी व नवोदित कॅरमपटू इक्बाल बागवान यांच्या मध्ये अतिशय चुरशीचा व उपस्थित प्रेक्षकांना कॅरम खेळाचा आनंद देणारा असा झाला.अमोलने पहिल्या गेममध्ये अतिशय सुंदर,असे देखणे कट,पाॅकेट जवळील अवघड पिसेस घेऊन उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.व पहिला गेम 27 /13सहज घेऊन आघाडी घेतली.दुसऱ्या गेममध्ये इक्बाल आपल्या झालेल्या चुका सुधारून दडपण घेता व अमोल होगाडे ला चुका करणेस भाग पाडले व या अचुक संधीचा फायदा घेऊन इक्बाल ने दुसरा सेट 26 /9 असा सहज घेऊन 1/1 अशी बरोबरी केली.तिसऱ्या गेममध्ये उपस्थित प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने कॅरम खेळांचा आनंद मनमुराद लुटला.अमोल तीन बोर्ड पर्यंत 8/4असा आघाडी वर होता.पण नंतर नवोदित अशा इक्बाल ने कोणतेही दडपण घेता व शेवटच्या सातव्या बोर्ड मध्ये स्कोर18/17 असा होता इक्बाल एक गुणांनी आघाडी वर होता.इथे कोणतीही चुक करणे परवडणारे नव्हते बघणाऱ्या प्रेक्षकांचा सुध्दा मला वाटते त्यावेळी बी पी वाढला असणांर , सर्व प्रेक्षक श्वास रोखून, सामना पहात होते. इक्बाल ने .शेवटची थम ची अवघड अशी ( क्वीन) राणी पिस उत्क्रुष्ठ कट मारून अलगद पाॅकेट गेली. कव्हर करून दिमाखात अंतिम सामन्यात प्रथमच प्रवेश केला. व जमलेल्या प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारत आपला आनंद व्यक्त केला. अशी अतिशय सुरेख सुंदर लढत झाली .आज झालेल्या अंतिम सत्रात गतविजेता रोहित चौगुले व नवोदित इक्बाल बागवान यांच्या त अतिशय चुरशीची अशी प्रेक्षणीय लढत झाली. इक्बाल शेख ने उत्क्रुष्ट कट,व समोरील अचूक पिसे घेऊन 7 बोर्ड पर्यंत 12/10अशी आघाडी घेतली होती. मध्ये रोहित ने घेतली आठव्या बोर्ड मध्ये ने अतिशय सुरेख लाजवाब असे कट,.परतीचे शाॅट मारून पहिला सेट 16/12/असा घेऊन 1 /0आघाडी घेतली.दुसऱ्या सेटमध्ये रोहित सहाव्या बोर्ड अखेर 11 /8असा आघाडी वर होता पण नंतर इक्बाल ने पाॅकेट जवळील , अचूक पिसेस घेऊन व परतीचे असे बघत राहावे सुंदर अप्रतिम फटके मारत दुसरा सेट 17 /11असा घेऊन 1 /1अशी बरोबरी केली.तिसऱ्या गेम इक्बाल चा आत्मविश्वास वाढला व रोहित समोरच्या सोप्या पिसेस चुकू लागला,याचा अचुक फायदा इक्बाल ने तिसरा सेट 18् /7 असा घेऊन रोहित चौगुले चा धक्कादायक पराभव करून आपले कारकिर्दीत मधील पहिले वाहले जिल्हा कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून सावली चषकचा पहिला मान मिळविला.या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावली केअर सेंटर प्रायोजक श्नी किशोर देशपांडे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेतील पहिला ब्रेक टू फिनीशचा मान रियाज शेख यांनी मिळविला.त्यांना नामदेव टमके प्रायोजक यांच्या हस्ते देण्यात आला.पुढील राज्य अजिंक्यपद स्पर्धा पालघर येथे होणार आहेत.या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कॅरम संघटनेचे जयवंतराव नलावडे, नामदेव टमके,प्रा विराज जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गावडे, प्रमूख प़ंचाचे काम गौरव हुदले,आशिष हांडे,, बोर्ड रेफरी म्हणून शोभा कामत,जमीर आतार, शिवराज देसाई, इतर. काम पाहिले. सुत्रसंचलन सौरभ शेवाळे यांनी केले.दिलदार मनांचा कॅरमपटूं मंझुरभाई बागवान हे वरीष्ठ गटात त्यांना मिळालेले तृतीय क्रमांकाचे 500 रूपये चे बक्षिसां मध्ये स्वता कडील 500 रूपये देऊन सावली केअर सेंटर मदद म्हणून रूपये 1000 दिले मंजूर बागवान यांच्या दिलदार पणांला सर्व उपस्थित प्रेक्षकांची टाळ्यांच्या गजरात त्यांचे जोरदार अभिनंदन केले.राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी कॅरमपटूंची निवड करण्यात आली.यामध्ये खुला गट इक्बाल बागवान,रोहित चौगुले, सुनील कांबळे, अमोल होगाडे, गौरव हुदले,अख्तर शेख, वरीष्ठ गटात मध्ये सुनील दरवान ,शिवशंकर भस्मे आदींची निवड करण्यात आली आहे.ही स्पर्धा उत्क्रुष्ठ होणे साठी किशोर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सावली केअर सेंटर अमिर सय्यद, योगेश चव्हाण,कुणाल सरावणे, सुभाष वायदंडे,, सौरभ, विकास, युवराज, यांनी भरपूर कष्ट घेऊन मोलाचे सहकार्य केले.