Friday, September 20, 2024
Home ताज्या विश्वविक्रम वीर डॉक्टर अथर्व गोंधळी "नॅशनल मोस्ट टॅलेंटेड किड्स अवॉर्डने" सन्मानित

विश्वविक्रम वीर डॉक्टर अथर्व गोंधळी “नॅशनल मोस्ट टॅलेंटेड किड्स अवॉर्डने” सन्मानित

विश्वविक्रम वीर डॉक्टर अथर्व गोंधळी “नॅशनल मोस्ट टॅलेंटेड किड्स अवॉर्डने” सन्मानित

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ.अथर्व संदीप गोंधळी यास “नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ पुणे “यांचा “नॅशनल मोस्ट टॅलेंटेड किड्स अवॉर्ड ” सहाय्यक आयुक्त माननीय श्री संजय माळी ( जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अथर्व ने ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बारा तासात २९६ किलोमीटर सायकलिंग करून विश्वविक्रम केला होता याची नोंद दहा विश्वविक्रमात झाली आहे वयाच्या अकराव्या वर्षी तायक्वांदो मध्ये तो ब्लॅक बेल्ट झाला आहे याची दखल द डायसेस ऑफ एशिया यांनी घेऊन त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे ३० जानेवारी २०२२ रोजी ९ नऊ तासाची ट्रायथलॉन स्पर्धा ६ तास ३४ मिनिटे ५१ सेकंदात पूर्ण करून तो “यंगेस्ट बर्गमन” ठरला होता या ट्रायथलॉन स्पर्धेतही अथर्व चा विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. जगातील सर्वात अवघड असणारी ट्रायथलॉन स्पर्धा कमी वेळेत आणि कमी वयात पूर्ण करणारा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे .आतापर्यंत बारा विश्वविक्रमामध्ये त्याची नोंद आहे.
आजपर्यंत अथर्व ने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रादेशिक व राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळवले आहेत बाल रत्न ,क्रीडा रत्न, क्रीडा भूषण, रायझिंग स्टार, बेस्ट अथलेट्स अशी अनेकविध पुरस्काराची नावे आहेत
डॉ.अथर्व या चमकदार कामगिरी मुळेच नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ पुणे यांचा नॅशनल मोस्ट टॅलेंटेड किड्स अवॉर्ड त्याला मिळाला आहे हा सन्मान जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त माननीय श्री संजय माळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉ.अथर्वला श्री .माळी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
आणि अथर्व ने आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजात अनेक खेळाडू आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही मात्र अथर्वला त्याच्या मातापित्यांनीच चांगले मार्गदर्शन केले व प्रयत्न करायला लावून घडवत आहेत हे त्याच्यासाठी मोठे यश आहे आणि तो नक्कीच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय अशा खेळाडूंना प्रोत्साहित करणे गरजेचे असल्याचे श्री .माळी म्हणाले.
यावेळी बोलताना डॉक्टर अथर्व याने लहानपणापासून कशा पद्धतीने सायकलिंग व इतर स्पर्धेची तयारी केली याविषयी बोलून दाखवले. यावेळी कौशल्य विकास अधिकारी संगीता खंदारे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी एकनाथ खराडे वरिष्ठ लिपिक पवन बदगले, वरिष्ठ लिपिक विद्या धुमाळ वरिष्ठ लिपिक अनिता कोळी वरिष्ठ लिपिक रामचंद्र पांढरे रजनी मोरे धनाजी बागल आदी उपस्थित होते.यासाठी अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू, कपिल कोळी, क्रीडाशिक्षक विक्रमसिंह पाटील, रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके,आई सौ.मनीषा गोंधळी,वडील संदीप गोंधळी यांचे सहकार्य लाभले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments