शाहू मिल येथे भरविण्यात आलेल्या खाद्य जत्रेला मिळत आहे कोल्हापूरकरांचा प्रतिसाद
जत्रेच्या माध्यमातून मिळत आहे अस्सल कोल्हापूरच्या प्रदार्थांची चव चाखायला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधी मध्ये शाहू महाराज यांचे स्मृतीदिन निमित्त शाहू कृतज्ञता पर्व सुरु आहे.या पर्व निमित्ताने २३ एप्रिल पासून शाहू मिल येथे खाद्य जत्रा आयोजित करण्यात आली आहे.कोल्हापूरमध्ये असंख्य खाद्य पदार्थ बनविल्याची कला व कौशल्य महिलांमध्ये व बचत गटांच्या महिलांकडे आहे.या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बनविलेल्या खाद्य पदार्थाना व्यासपीठ मिळावे यासाठी याठिकाणी ही खाद्य जत्रा भरविण्यात आली आहे.कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी शाहू मिल येथे ही जागा मोफत उपलब्ध करून दिली असून ज्याद्वारे कोल्हापूर मधील विविध खाद्य पदार्थ चाखण्याची संधी ही कोल्हापूरसह महाराष्ट्र व संपूर्ण देशभरातून आलेल्या शाहू प्रेमींना मिळत आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शन प्रमाणे याठिकाणी नियोजन केले आहे. जिल्हा परिषद मधील अधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनक्ती अभियानचे अधिकारी, कर्मचारी यासाठी काम करत आहेत.यामध्ये सर्व तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानातील स्वयंमसहायता समूहाना खाद्य पदार्थ विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने शाहू काळातील पारंपरिक पद्धतीचे जेवण,जसे कि दही धपाटा, कोकम सरबत, करवंद लोणचे, करवंद जूस ठेचा ,डांगर भाकरी, पौष्टिक माडगे, चपाती भाजी, भरलेले वांगे, पुरणपोळी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, चिकन लोणचे,पाणी पूूूरी याचबरोबर कोकम सरबत,सरबत आदी व अशा प्रकारची वेगवेगळ्या पदार्थची पर्वणी बघायला व खायला मिळत आहे. यामध्ये सहभागी बचत गट यांना चांगली संधी उपलब्ध करून असून अनेक गटाना संधी दिली गेली आहे.
२३ मे पासून आतापर्यंत एकूण २८ बचत गटांच्या स्टॉलच्या माध्यमातून एकूण २० लाख रुपयांच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.या खाद्य जत्रेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्यातून बचत गटातील महिलांना आर्थिक उन्नती होणेसाठी फायदा होत आहे. कृतद्यता पर्वा मधील उर्वरित दिवसांमध्ये खाद्य जत्रेचा लाभ घ्यायला शाहू मिल येथे कोल्हापूर वासियांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अभियान व्यवस्थापक सौ.वनिता डोंगरे यांनी केले आहे.