कबनूर येथील जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसासाठी वाहतुक नियमन आदेश जारी
कोल्हापूर/ (जिमाका) : कबनूर ता. हातकणंगले येथे जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस कबनूर साजरा होणार आहे. उरुसासाठी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९१२ कलम ३३ पोटकलम (१) (ब) अन्वये दर्गा उरुस काळात दि. ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीसाठी कबनुर व परिसरात वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत.
वाहतुकीसाठी बंद व चालू केलेले मार्ग खालील प्रमाणे-
कोल्हापूरकडून येणा-या सर्व वाहनांसाठी कबनूर ओढा ते शाहू पुतळा आणि शाहू पुतळा ते कबनूर सर्व प्रकारच्या वाहनाना बंदी . कोल्हापूरकडून येणारी थांबे घेणारी एसटी बस कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना, नवीन नगरपालिका चौक, आंबेडकर पुतळा ते एसटी स्टॅण्ड अशी राहील तसेच परत इचलकरंजी एसटी स्टॅण्डहून कोल्हापूरला जाणारी त्याच मार्गाने परत जाईल.
कोल्हापूरकडून येणारी सर्व अवजड वाहने तसेच विना थांबा कोल्हापूर-इचलकरंजी एसटी बस अतिग्रे फाटा हातकणंगले मार्गे इचलकरंजीकडे येतील तसेच इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, नवीन नगरपालिका चौक, पंचगंगा कारखाना, कोरोची हातकणंगले मार्गाने कोल्हापूरला जातील.
कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी हलकी वाहने कबनूर ओढ़ा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना,नवीन नगरपालिका चौक अशी येतील.
नदी वेश नाका इचलकरंजीकडून कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने उत्तर प्रकाश टॉकीज संभाजी चौक, शाहू पुतळा, नवीन नगरपालिका चौक, पंचगंगा कारखाना, कबनूर ओढा मार्गे कोल्हापूरला जातील. इचलकरंजीहून चंदूरकडे जाणारी एसटी बस व इतर वाहने शाहूपुतळा तीनबत्ती चौक, सुर्वे नगर शाहूनगर, चंदूरला जाईल व त्याच मार्गाने येतील.
कबनूर हददीतील पार्किंग व्यवस्था- इचलकरंजी शहरातून शाहू पुतळा मार्गे जाणारी दुचाकी, चारचाकी वाहने कोल्हापूर नाका जवळील यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या बाजूने मैदान व रोडच्या कडेला पार्किंग करण्यात येतील.
कोरोची, शहापूरकडून येणारी दुचाकी व चारचाकी वाहने पंचगंगा कारखाना दक्षिण बाजूचा गाडी अडडा मैदान.
कोल्हापूरकडून येणारी रुई, साजणी, तिळवणीकडून येणाऱ्या वाहनांना कबनूर ओढा पुलाजवळील मोकळे शेत जमीन.
या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली असून भाविकांनी इतर कोणत्याही ठिकाणी पार्किंग करु नये. जाहिरनामा व त्यामध्ये नमुद केलेले निर्देश दि. ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अमलात राहतील.