Sunday, July 14, 2024
Home ताज्या अभिनेता विराट मडकेला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

अभिनेता विराट मडकेला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

अभिनेता विराट मडकेला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : एखाद्या कलाकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार हे स्वप्न असते. त्यात पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यावर तर वेगळीच उर्जा मिळते. मराठी फिल्मफेअर पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. त्यात अभिनेता विराट मडकेला फिल्मफेअरचा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. केसरी –Saffron या सिनेमासाठी विराटला फिल्मफेअर २०२१चा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सर्वच कलाकार हे चांगल्या कामाच्या शोधात होते.
काही चांगलं घडेल याची वाट पाहात होते आणि पुरस्कार सोहळ्यांनी कलाकारांना खरंच हुरुप आला आहे. विराट आपल्या या पहिल्या पुरस्काराबद्दल सांगतो, ”मला खरंतर सुरुवातीला विश्वासच बसला नाही, स्वप्नातही मी विचार केला नव्हता, हा असा दिवस असेल. पहिल्या सिनेमासाठी मिळालेली ही शाबासकीची थाप खूपच मोलाची आहे. मेहनतीचं चीज झालं असं वाटत आहे. दोन ती वर्षे केसरी साठी मेहनत केली होती. त्यानंतर दोन वर्ष कोरोनामुळे कठिण काळ होता. पुढे काही चांगलं होईल का असंच वाटत होतं. पण, एका बाजूला सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. तसंच आता फिल्मफेअर सारखा पुरस्कार मिळाला त्याने खूपच आनंद झाला आहे.” सुजय डहाके दिग्दर्शीत केसरी –Saffron या सिनेमात
विराटने कुस्तीविराच्या भूमिकेत दिसून आला होता. विराटने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती. पैलवानाच्या शरीरयष्टीसाठी अत्यंत मेहनतीने, कुठल्याही व्यायाम आणि आहाराच्या बळावर शरीर कमावले होते. सिनेमा रिलीज झाला तेव्हा विराटचे कौतुक झाले होते. आता पुरस्कार रुपाने त्याच्या कामावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विराट मडके दिपक राणे फिल्मच्या आगामी मराठी -कन्नड सिनेमात काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments