उत्तरमध्ये शेकापचे मविआ च्या जयश्री जाधव यांना बळ – संपतराव पवार-पाटील
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शेकापच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाठिंब्याचे पत्र माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी जयश्री जाधव यांना दिले.संपतराव पवार-पाटील म्हणाले, सत्तेसाठी सुरु असलेल्या स्वार्थी राजकारणात विचाराच्या राजकारणाला तिलांजली दिली जात आहे. या मतलबी राजकारणात विचाराचे राजकारण टिकून राहावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांना पाठींबा देत आहे.
जयश्री जाधव यांनी संपतबापू पाटील यांचे विजयासाठी आशीर्वाद घेतले.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांना सामाजिक व व्यावसायिकतेची जाण होती. शेती व उद्योगाला चालना मिळाली पाहिजे यासाठी आण्णां सातत्याने प्रयत्नशिल होते. आण्णांच्या कार्याचा वारसा अखंडीत सुरु रहावा यासाठी शेकाप जयश्री वहिनीच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहीली आहे असे मत प्रा. टी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.शेकापच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याचे पाठबळ मिळाल्याने जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे, असे मत बाबूराव कदम यांनी व्यक्त केले.
सुभाष सावंत, प्रमोदिनी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कुमार जाधव, संभाजी जगदाळे, ॲड. कार्तिक पाटील, ॲड.रवीराज बिर्जे, संग्राम माने, प्रकाश शिंदे, राजाराम धनवडे, रंगराव पाटील, मधुकर हरेल, सरदार पाटील, अस्लम बागवान, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, प्रिया जाधव,शिवानी शिर्के, दमयंती कडोलकर, योगीता पाटील, आनंदा पोहाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.