ऑनलाईन रेशन धान्यं वितरण पध्दतीमुळे गैरप्रकारास आळा जिल्हा पुरवठा अधिकारी मां.दत्तात्रय कवितके
कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर व सायबर महाविध्यालय यांचे संयुक्त विध्यमानाने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ व व्याप्ती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सायबर येथे पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी मां.दत्तात्रय कवितके साहेब व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव मां.अरूण वाघमारे उपस्थितीत होते.यावेळी जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार करून जिल्हा ग्राहक पंचायतने केलेल्या कामाची माहिती सांगितली व येणार्या काळात राबवणेत येणारी ध्येय धोरणे व संकल्प मांडले.यानंतर प्रमुख पाहुणे *मां. दत्तात्रय कवितके साहेब यांनी जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबवनेत येणारी अन्न धान्यं वितरण यंत्रणा तोकडी असुन देखील सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पुरवठा विभाग करत आहे. सध्या ऑनलाईन रेशन वितरण पध्दतीमुळे होणार्या गैरप्रकारास आळा बसुन वितरणात ९०% पारदर्शकपणा आला आहे. पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत यांच्या समन्वयातून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यानंतर राज्य सचिव मा.अरूण वाघमारे साहेब* यांनी ग्राहक प्रबोधन व संघटनात्मक जबाबदारी या विषयावर बोतताना ग्राहक पंचायतचा कार्यकर्ता कसा असावा,त्यांची संघटनात्मक जबाबदारी काय आहे, त्यांनी ग्राहकांचे प्रबोधन कसे करावे, शासन स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवताना ग्राहक प्रतिनिधीं म्हणून आपण संवाद कसा करावा. तसेच काळाची गरज ओळखून विद्यार्थी ग्राहक प्रबोधन करणेचे काम करणेत यावे.तसेच कायदेशीर सल्लागार अँड.राजेंद्र वायगणकर यानी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ व व्याप्ती याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर सायबर महाविध्यालयचे विभाग प्रमुख डॉ.डी एम भोसले सर यांनी Aaichya madhyamatun विश्लेषण दिले व ग्राहक संरक्षण व सामाजिक दाईत्व ग्राहकांच्या जबाबदाऱ्या काय व ग्राहकांनी कशा पद्धतीने जागरुक राहावे याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी विभागीय संघटीका मां सुनिता राजे घाडगे व राज्य सदस्य एस एन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर पदाधिकारी यांच्या शंका निरसनचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन संघटक सुरेश माने व संघटीका पूनम देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन अशोक पोतनीस यांनी केले.यावेळी कार्यशाळा उपस्थितीत पदाधिकारी यांना प्रमाणपत्र देणेत आले.यावेळी प्रवासी महासंघाचे संजय पोवार, पूणे विभागीय सदस्य सुशांत पाटील, उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, सचिव दादासो शेलार,श्री.सत्यजित खाडे, संघटीका प्रमोदिनी माने, सदस्या वैष्णवी गुरव ग्राहक पंचायतच महाराष्ट्रचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व सायबर महाविध्यालयचे विद्यार्थी उपस्थित होते.