Monday, December 23, 2024
Home ताज्या भारतातील आयडियल प्रकल्पाच्या माध्यमातुन आण्णासाहेब चकोते यांचे चकोते ग्रुपच्या माध्यमातून उद्योग जगतात...

भारतातील आयडियल प्रकल्पाच्या माध्यमातुन आण्णासाहेब चकोते यांचे चकोते ग्रुपच्या माध्यमातून उद्योग जगतात दमदार पाऊल

भारतातील आयडियल प्रकल्पाच्या माध्यमातुन आण्णासाहेब चकोते यांचे चकोते ग्रुपच्या माध्यमातून उद्योग जगतात दमदार पाऊल

 

बदलत्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे राहून देश विदेशातील नवनविन तंत्रज्ञान, हायजेनिक प्रॉडक्ट, अत्याधुनिक सुविधांसह भारतातील आयडियल प्रकल्पाच्या माध्यमातुन चकोते ग्रुपचे उद्योग जगतात दमदार पाऊल टाकत आहे. १९९१ साली जेव्हा लाकडी भट्टीची सुरुवात झाली तेव्हा कोणताही अनुभव नव्हता शिवाय सर्वच काम अत्यंत कष्टाचे होते. मात्र कोणतं काम कमी न समजत भट्टीची बांधणी करणे, कच्चामाल खरेदी, कणिक मळणे, हाताने कटिंग करणे, यावरून प्रॉडक्ट भट्टीत सोडणे, भाजणे, पॅकिंग करणे, बाजारात जाऊन साद घालून आपले प्रॉडक्ट विक्री करणे, अशा कोणत्याही कामात अण्णासाहेब चकोते यांनी स्वतःला कमी पडू दिले नाही. ही कामे करताना मात्र जे ज्ञान आणि अनुभव घेतला तो कोणत्याही शाळा-कॉलेजात जाऊन किंवा पुस्तकातून सुद्धा मिळणे शक्य नाही. याच बरोबर उद्योग वाढीस लागत असताना आण्णासाहेब हे कामाचे नियोजन, व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील बारकावे,मार्केटिंगची कला सुद्धा आत्मसात करत होते. कोणतीही गोष्ट येत नाही म्हणून चुट्पुटत न बसता प्रत्येक क्षण शिकत जगणं हाच अण्णासाहेबांचा खरा स्वभाव आणि त्यासाठी कोणत्याही मर्यादेचा कुंपण न ठेवता चौकटी मोडून काढत, जे हवे ते शिकायचं, जे आवडेल ते मनापासून करायचं, मनापासून जीव ओतून करायचं.. म्हणजेच त्यांच्या भाषेत जगायचं.. आणि जगण्याचं हेच गुपित त्यांना गवसलंय…त्यामुळेच भारतातील बेकरी उद्योग जगतातील गणेश बेकरीचे संस्थापक चेअरमन श्री. अण्णासाहेब चकोते यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानाने घेतले जाते.
एका ठराविक टप्प्यानंतर उद्योजक आपल्या विश्वात रमणे एका मर्यादित एरिया व मार्केटमध्ये “रिजनल ब्रँड” बनून राहणे पसंत करतात. मात्र भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनांना घेऊन पसरणेचे फक्त स्वप्न उराशी बाळगुन अण्णासाहेब थांबले नाहीत. संपूर्ण भारतभर फिरून बेकरी उद्योगाच्या मुळाशी जाऊन त्यांनी अभ्यास तर केलाच पण नव्या जगाचे, बदलत्या बाजारपेठेचे भान ठेवून काल्पनिक कृतीत न रमता युरोपियन राष्ट्रे, जर्मन, चीन मलेशिया, दुबई आदी ठिकाणी त्यांनी बेकरी उद्योगातील अद्ययावत तंत्रञानाची माहिती घेतली त्यांचा अभ्यास केला. हे सर्व घडत असताना मात्र येणाऱ्या काळात काही औरच दडले होते. ३ मार्च २०२० मध्ये नूतन प्रकल्पाचा पाया घालत असतानाच २२ मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन झाले व कोरोना महामारीने अवघ्या जगामध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात झाली. संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली. मुक्त संचारावर लावलेल्या निर्बंधामुळे मोठा फटका उत्पादन क्षेत्रातील संस्थावर देखील झाला. त्याची झळ चकोते उत्पादनांना तर बसलीच पण नवीन प्रकल्पाच्या बांधणीत देखील अडसर निर्माण झाले. कोरोना नामक आलेल्या वादळात आपली स्वप्ने हरवून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. इतका मोठा प्लांट उभारणीचा हा पहिलाच अनुभव त्यात असे काही अकल्पित घडेल याचा कधी विचारही केला नव्हता. संपूर्णपणे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रकल्पाचे कामकाज ठप्प झाले. इतक्या मोठ्या प्रोडक्शन लाईन्सची ऑर्डर व पेमेंट केले गेले होते. जगभरातील निर्बंधामुळे सदर मशीन उत्पादक संस्थासोबतचे संभाषण पूर्णपणे थांबले होते. अशा परिस्थितीत नेमके काय करावे हेच कळत नव्हते. आयात-निर्यात बंद असल्याने मशिन्स येण्याची शक्यता तर नव्हतीच पण झालेली गुंतवणुकीचे काय हा यक्षप्रश्न आ वासून उभा होता. पण आता थांबून चालणार नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांच्या ठायी उपजत असणारे असीम धेर्य व विश्वासाची शिदोरी घेऊन ते या संकटाचा सामना करण्यासाठी तयार झाले
मशीन सप्लायर्सना ज्या ज्या माध्यमातून शक्य आहे त्या मार्गाने संपर्क करणे सुरू केले. हळूहळू परिस्थिती निवळताना दिसूं लागली. मशीन सप्लाय करणाऱ्या कंपनीनी प्रतिसाद दिला व शेवटी मशनरी येण्यासाठी तयार झाली. मजल दरमजल करत लॉकडाऊनच्या ऑब्स्टॅकल्स पार करत एकदाची मशीन्स मुंबईमध्ये दाखल झाली व नंतर काही कालावधीने ती साइटवर पोहोचली पण पुढे काय? आता ही मशीन इन्स्टॉल कशी करायची हे एक नवे आव्हान उभे राहिले तरीही धाडसाने आपली जवळपास ची टीम घेऊन या ४०० मीटरच्या अजस्त्र मशीन्स जोडणे सुरू झाले. व्हिडिओ कॉन्फरंस द्व्यारे इथल्या मशीनचे PLC कंट्रोलिंग घेऊन त्याद्वारे मशीन सुरू करण्यात आल्या. अनेक नवीन मार्ग पुढे चालेल तसे दिसूं लागले. धुक्यात हरवलेली वाट सापडू लागली.स्पर्धा कुणालाच चुकलेली नाही हे स्वीकारून काळाच्या सोबत चालताना स्वतःमध्ये आणि तंत्रज्ञानात आवश्यक बदल घडवत व्हिडिओ कॉल, वर्क फॉर्म होम अशा संकल्पनांना अंगीकारत नवीन पिढी, नवे तंत्रज्ञान यांच्याशी पटकन नातं जोडण्याची भूमिका त्यांनी घेतली. ठाम विश्वासाने संपूर्ण ताकद, बुद्धी, अनुभव पणाला लावून बरे-वाईट अनुभव घेत संकटावर मात करत लढण्याचे बळ कमावले.महाकाय कंपन्यांसाठी हा जेवढा कठीण काळ आहे त्याच्या उलट “लोकल टू ग्लोबल” हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून बाजारातील संधी शोधण्यात यशस्वी झाले. मूळतः उत्तम निरीक्षण शक्ती, अभ्यासाद्व्यारे साधलेली अचूकता,प्रयोगशीलता, तसेच दूरदर्शी स्वभावामुळे येणाऱ्या काळातील आपत्कालीन परिस्थितीत आपल्याकडील योजनासाठीचे प्रयत्न अण्णासाहेबांनी सुरू केले व प्रकल्पाची वाटचाल वाटचाल पुन्हा सुरू झाली.
वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर तावून सुलाखून निघालेल्या या प्रकल्पाची वैशिष्ट्ये सुद्धा ५२ कशी सोन्याइतकीच झळाळत आहेत. सदर नियोजित प्रकल्प नांदणी येथील फूडपार्क मधील १३ एकर जागेमध्ये आणि २.५० लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. जागतिक दर्जाची हायटेक तंत्रज्ञान, सुविधा, कमीतकमी ठिकाणी मानवी इंटरफेस, स्वयंचलित मशनरी यु.एस, जपान, युरोप आणि चीनमधून आयात केले गेले आहेत. सदर प्लॅन्टमध्ये ISO 22000 व HACCP मानकांची अंमलबजावणी करणेत येईल. उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे कच्चा मालापासून ते तयार माल व पॅकेजिंग पर्यंत सर्वांना काही वैज्ञानिक चाचणी प्रक्रियेतून जावे लागेल. त्यामुळे सर्वोत्तम गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्लॅनमध्ये तयार झालेली उच्च गुणवत्तापूर्ण असणारे उत्पादने ही त्यांची चव, रंग, पोत, माऊथफिलिंग या सर्व मूलभूत चाचण्या घेतल्या नंतरच ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. या प्रकल्पातील स्वच्छता, सुरक्षा व व्यवस्थापन प्रणालीची उत्तम आणि विश्वासार्ह प्रक्रिया पाहण्यासाठी सर्व ग्राहकांसाठी व्हीजिटर गॅलरी देखील लवकरच सुरू होत आहे. नक्कीच या प्रकल्पाद्वारे उत्पादीत होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवीन बेंचमार्क सेट करेल यात शंका नाही.
एखाद्या कुशल सारथ्याप्रमाणे सर्व दोर हातात घेऊन आर्थिक आघाडीवर देखील ते लिलया सांभाळताना दिसतात. कंपनीची आर्थिक धोरणे ठरवणे, आर्थिक नियोजन करणे, महत्त्वाचे निर्णय घेऊन व्यवस्थापनाचे नियमन करणे, खरेदी व मार्केटमधील गुंतवणूक, प्रोजेक्ट, प्रोजेक्ट कॉस्टिंग,त्याचा फायनान्सवरील येणार लोड या सर्वच बाबतीत अण्णासाहेब सातत्याने कार्यरत असतात.इतर सर्व विभागाप्रमाणे या एच. आर विभागात सुद्धा त्यांची हातोटी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कंपनीबरोबर एक नातं असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. शेवटी केबिन मध्ये बसलेले मालक आहेत आपण त्यांच्यासाठी काम करतो ही भावना सोडली पाहिजे असे ते म्हणतात. प्रत्येक कर्मचाऱ्यांला नव्हे मालकाला कंपनी चालवण्याची संधी मिळत असते व त्याची जबाबदरी तसेच त्याचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे. त्यामुळेच नवीन प्रकल्पांमध्ये देखील जुन्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. इतर कोणत्याही कॉर्पोरेट बॉसपेक्षा अण्णासाहेबांचे कामाचे तास जास्त असतात. दिवसभराच्या कामाला ते कधीही कंटाळत तर नाहीत, पण त्यानंतर रात्री देखील वाचन, अध्यात्माचे श्रवण ही करतात. खरेतर त्यांना कोणताच विषय वर्ज्य नाही ते जसे प्रोडक्शन, तंत्रज्ञान, फायनान्स, डेव्हलपमेंट, सिव्हिल यामध्ये रमतात तसेच चित्रपट, संगीत, क्रीडा अगदी राजकारणात देखील काय चालले आहे हे समजून घ्यायला त्यांना आवडते. बदलत्या जीवनशैलीबाबत सतर्क लक्ष ठेवत काळाच्या थोडे पुढे जाऊन चौफेर विचारांमुळेच अण्णासाहेब भविष्याची नेमकी चाहूल घेतात. यामुळेच वेळोवेळी उंचावत चाललेल्या त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख पाहता त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची व व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते.एम. बी.ए अभ्यासक्रमात मार्केटिंग ची ४पी शिकवले जातात पण अण्णासाहेबांनी आपल्या अनुभवातून व्यवहारी जगातील ५पी वर प्रभुत्व मिळवले आहे. त्याला अध्यात्माची सुद्धा प्रगल्भ जोड त्यांनी दिलेली आहे. आपल्या संपन्नतेच्या हेतू अर्थात “पर्पज” ठरवणे महत्त्वाचे आहे. त्याचा उपयोग फक्त आपल्या विश्वासपुरता न होता समाजाच्या, राष्ट्राच्या उद्धारासाठी सुद्धा त्यांचा वापर व्हावा. हे कमावताना महत्त्वाचे काही “प्रिन्सिपल्स”.. म्हणजेच कोणत्याही मार्गाने पैसा कमवता कामा नये याची स्पष्ट तत्व. त्यामुळे या मार्गावर जायचे आहे त्यासाठीची पुरेशी पूर्वतयारी म्हणजेच “प्लॅनिंग” या मार्गाने जाताना लागणारी “प्रॅक्टिस” व सातत्य आणि या सर्वांसोबत सर्वात महत्वाचे “पेशन्स” म्हणजेच संयम.. या गोष्टीतून त्यांचे अपार कष्ट वेचणाऱ्या, चोखाळलेल्या मार्गांचे दर्शन होते व आत्मविश्वास, मानसिक सामर्थ्य, दूरदृष्टीने केलेला लक्ष्यनिश्चिती आणि सर्वोत्तमेचा ध्यास या चतुसूत्रीमध्ये अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्व गुंफता येते.लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३५० बस स्टॅन्ड एका दिवशी स्वच्छ करणेची मोहिम असो किंवा कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करून २०२५ लोकांनी एका वेळेला रक्तदान केलेले असो यासारख्या अनेक उदाहरणांतून त्यांची समाजाप्रती असणारी आत्मियता व बांधील की दिसून येते.केवळ विक्री नफा वितरण, उत्पादन याच गोष्टींवर आघाडीवर न राहता ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार उत्पादने, पॅकेजिंग, किंमत, जाहिरात यामध्ये ते बदल करत आहेत. पुन्हा एकदा ब्रॅण्डच्या स्वरुपात पारंपारीक चवीची उत्पादने अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून देण्यासाठी अण्णासाहेब सरसावले आहेत. भविष्यातील उतुंग व विशाल यशाची पायाभरणी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून ते करत आहेत. अण्णासाहेबांना उद्योग भरारीसाठी लवकरच सुरू होणाऱ्या जागतिक दर्जाच्या नूतन प्रकल्पासाठी व त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सौजन्य – शब्दांकन –  गणेश बेकरी नांदणी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments