Tuesday, November 12, 2024
Home ताज्या कामगार चाळी संदर्भात सविस्तर इतिवृत्त बनवून आयुक्ताना प्रस्ताव सादर करा - नाम....

कामगार चाळी संदर्भात सविस्तर इतिवृत्त बनवून आयुक्ताना प्रस्ताव सादर करा – नाम. सतेज पाटील यांनी केल्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

महापालिकेच्या हद्दीत भाडेकरारावर दिलेल्या जागांची यादी बनवा

झोपडपट्टी मुक्त कोल्हापूर बनविण्यासाठी संभाजीनगर येथील कामगार चाळ येथील २८२ घरांचे नियोजन

कामगार चाळी संदर्भात सविस्तर इतिवृत्त बनवून आयुक्ताना प्रस्ताव सादर करा – नाम. सतेज पाटील यांनी केल्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी पेठ आणि संभाजीनगर येथील कामगार चाळ येथील सफाई कामगारांच्या जागा खरेदीसदर्भात झालेल्या बैठकीचा सविस्तर इतिवृत्त बनवून आयुक्ताना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नाम. सतेज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.कामगार चाळीच्या जागा खरेदीसदर्भात आज महापालिका निवडणूक कार्यालयात बैठक पार पडली.सफाई कामगारांना घरे मिळावी यासाठी २०१५ ला शासन निर्णय झाला. या पार्शवभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी बापेठ ८२२ ए वॉर्ड येथील सफाई कामगारांना महापालिकेने सात दिवसाच्या आत पैसे भरण्याच्या नोटीसा दिल्या. यावेळी सर्वच सफाई कामगारांनी ५० हजार ४९० रुपये महापालिकेकडे भरले. यापैकी केवळ १५ लोकांचिंच खरेदी झाली तर उरलेल्या ३८ लोकांना चालू रेडिरेकनर प्रमाणे पैसे भरावेत असे कारण पुढे करत महापालिका चालढकल करत असल्याने आज महापालिका निवडणूक कार्यालयात सफाई कामगार आणि महापालिका अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.२०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या लोकांनी पैसे भरले आहेत त्या लोकांना जागा खरेदी करून देण्यासंदर्भात नाम. सतेज पाटील यांनी सकारात्मकता दाखवली , प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे जागा खरेदी न झाल्याने महापालिकेने या बैठकीचा सविस्तर कार्यालयीन इतिवृत्त बनवून तो प्रस्ताव आयुक्तांना पाठवावा अशा सूचना नाम. पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. झोपडपट्टीमुक्त कोल्हापूर शहर बनवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना संभाजीनगर येथील कामगार चाळीत २८२ घरे देण्यासादर्भात महापालिका अधिकाऱ्याकडून आढावा घेतला. दरम्यान, टिम्बर मार्केट गवत मंडई येथील झोपडपट्टी मधील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जागा खरेदी मिळावी किंवा ९९ वर्षाच्या करारावर मिळावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली असता महापालिकेच्या हद्दीतील भाडेकरारावर दिलेल्या सर्व जागांची यादी बनवा यावर पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेऊ असं नाम. सतेज पाटील यांनी सांगितलं.या बैठकीला उपायुक्त रविकांत आडसूळ, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कामगार चाळीतील अर्जुन सकटे, कपिल सकटे, सुनील तुपे, प्रदीप साठे, विनय बारावशे, अक्षय पटवणे,चेतन सोनवणे, अमर उमरवाल आणि महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments