येत्या चार वर्षात कोल्हापूर सर्वच क्षेत्रात आघाडीचे केंद्र बनेल – पालकमंत्री सतेज पाटील
१५ ते १८ एप्रिल या कालावधीत होत असलेल्या “व्हायब्रंट महाएक्सपो २०२२”प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे अनावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ, करवीर एमआयडीसी, डेस्टिनेशन कोल्हापूर, राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यासारख्या नव्या प्रकल्पांवर प्रशासकीय यंत्रणा वेगात काम करत असून येत्या चार वर्षात कोल्हापूर हे पुण्या मुंबईबरोबरच व्यापार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनेल असा विश्वास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्हायब्रंट महाएक्सपो २०२२ या प्रदर्शनाचे १५ ते १८ एप्रिल या कालावधीत येथील शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यावर्षीचे हे आठवे वर्ष आहे.या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे अनावरण प्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. येथील रेसिडेन्सी क्लब येथे हा कार्यक्रम झाला.या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री.ललित गांधी,कोल्हापूर चेंम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे,जनसुराज्य शक्ती युवाचे अध्यक्ष समित कदम कोल्हापूर इंजिनियरीग असोसिएशन सचिन मेनन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल आणि हातकंणगलेचे अध्यक्ष संजय पेंडसे,गोषीमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागलचे प्रेसिडेंट दिपक पाटील,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशनचे प्रेसिडेंट रवींद्र पाटील,क्रीडाई कोल्हापूरचे प्रेसिडेंट विद्यानंद बेडेकर,वेस्टर्न महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे संचालक श्री.सत्यजित भोसले, कोल्हापूर चेंबर ऑफ कामर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने ,प्रदीपभाई कपाडिया आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की कोल्हापुर हे आता विकसित होत असून पुण्या मुंबई पाठोपाठ लोक आता कोल्हापूरला प्राधान्य देत आहेत कोल्हापूरला चालना देण्यासाठी आपण सर्वच घटकांनी व उद्योजकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगून कोल्हापूरच्या जवळ कोकण व गोवा आहे याठिकाणी आपला भाजीपाला व अन्य उत्पादन जाण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रयत्न करूया असे सांगितले.कोल्हापूरमधून सध्या तीन विमाने उड्डाण करतात कोरोना मुळे अडचणी आहेत नाईट लँडिंगची तयारी केली जात आहे.कोल्हापूर मुंबई उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरळीत होईल.विस्तारीकरणासाठी अजून ६४ एकर जागा आवश्यक आहे १००० च्या आसपास मालक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना इतर पर्यायी जागा देऊन जागेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोल्हापूरमध्ये चांगले अनेक नवनवीन प्रोजेक्ट आणले जात आहेत यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.पर्यटक येण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू आहेत कला व सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शिवाय इन्फ्रास्ट्रक्चर व भौगोलिक दृष्ट्याही सुविधा देऊन कोल्हापूरला पुढे नेणे आवश्यक आहे. यासाठी नव्या पिढीला सहभागी करून मार्केटिंग करणे गरजेचे आहे असे ना पाटील यांनी सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय जागा आहेत करवीर एमआयडीसीसाठी हलसवडे व तांमगाव येथील जागा ताब्यात घेण्याचा विचार सुरू आहे कोल्हापूर मध्ये ऊस पीक घेतले जाते व त्यापासून गूळ बनतो गूळ व अँग्रीकलचर याचा अभ्यास केला गेला आहे तीन वर्षांचा प्लॅन तयार असून आता ऊस शेती करण्यासाठी वाढीव जागा नाही म्हणूनच आहे त्याच शेतीतून जादा उत्पादन कसे घेता येईल व शेतकऱ्यांनाही याचा कसा फायदा होईल यासाठी प्लॅन तयार असल्याचे सांगितले.शिवाय आयटी क्षेत्रात खूप स्कोप आहे हे क्षेत्र विकसित करण्यासाठी आयटी पॉलिसी आणणे आवश्यक आहे.ईव्ही पोंलिसी मध्येही कोल्हापूरला पुढे नेणे आवश्यक असल्याचे सांगितले.राज्याचे बजेट फायनल होत आहे कोल्हापूरसाठी दहा बाबी मागितल्या आहेत त्यातील काही बाबी पूर्ण होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.व्हायब्रंट महाएक्सपो २०२२ प्रदर्शन हे उद्योजकांना नवी चालना व वेगवेगळे उद्योग उभे करण्यासाठी प्रेरणा देणारे असणार आहे असे सांगितले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री.ललित गांधी यांनी बोलताना औद्योगिक उत्पादनाचे हे प्रदर्शन असून उद्योजकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळेल देशभरातील नामवंत कंपन्यांचे स्टॉलचा समावेश या प्रदर्शनामध्ये असून दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीनंतर हे विकासाला चालना देणारे नव्या पद्धतीचे प्रदर्शन भरविले गेले असून प्रदर्शनाच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान याची माहिती होणार आहे रोबोटीक टेक्नॉलॉजीचा यामध्ये समावेश आहे याचा उपयोग उदयोग क्षेत्रात नव्या पिढीला करता येणार आहे. नवीन डिफेन्स सेक्टरलाही याचा फायदा होणार आहे.डेस्टिनेशन कोल्हापूर ही संकल्पना यातून मांडली जाणार आहे यामुळे कोल्हापूरचे नाव प्रदर्शनाच्या माध्यमातून एक नवीन ब्रँड म्हणून पोहोचणार आहे यासाठी पालकमंत्री ना सतेज पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहूया असे सांगितले.यावेळी बोलताना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रदर्शनातील विविध साहित्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा व नवीन उत्पादनांची, केंद्रांची माहिती होण्यासाठी प्रदर्शनाचा उपयोग उद्योजकांना होणार असल्याचे सांगितले.मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे या प्रदर्शनाच्या माध्यमातून इंजिनियरसाठी नवा प्लँटफॉर्म उपलब्ध केलेला आहे असे सांगितले. फौंड्रिं इकविपमेंटचे रविंद्र चिरपुटकर यांनी बोलताना रोबोटीक अँटोमेशन करणे आवश्यक आहे यामुळे कमी वेळात चार युनिटची कामे होऊ शकतात असे सांगितले.
क्रीडाईचे विद्यानंद बेडेकर यांनी बोलताना उद्योजकांसाठी आपण याआधी बैठक घेतली होती त्यानुसार आदर्श कोल्हापूर घडवावे लागणार आहे यासाठी पालकमंत्री म्हणून आपण सर्व उद्योजकांना एकत्र करून उद्योग क्षेत्राला आणखी चालना कशी देता येईल याबाबत मार्गदर्शन करावे असे सांगितले.वेस्टर्न महाराष्ट्र.. महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे संचालक श्री.सत्यजित भोसले यांनी वेस्ट साहित्यातून नव्या टिकाऊ वस्तू बनविल्या जातात त्याची इंडस्ट्री आपल्या कोल्हापूर मध्ये होणे आवश्यक आहे असे सांगितले.जनसुराज्य शक्ती युवाचे
अध्यक्ष समीत कदम यांनी बोलताना कोरोना काळात सर्व व्यवहार कोलमडले होते.आता नव्याने उभारी घेता येणार असून कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्र येऊन प्लॅन तयार करणे गरजेचे आहे असे सांगितले.यावेळी सूत्रसंचालन ताज मुल्लानी यांनी केले तर आभार हरिष भाई पटेल यांनी मानले.
या प्रदर्शनात एकूण १०० च्या पासपास कंपन्यांचा सहभाग असणार आहे यामध्ये गोदरेज अँड बॉईसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि, ओसवाल ब्रदर्स, सेफसील्स मशीन प्रायव्हेट लिमिटेड ,इकविनोकस एन्व्हायरमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इंगर सील लिमिटेड,ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, न्यूमीनल पॉवर, अंजनी ट्यूबज इंडिया, खतेद्र मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, रामासा क्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड,यंत्रा न्यूमॅटिक अँड इक्विपमेंट,एमएनके बिल्डिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, पॅकनेक इंडस्ट्रीज ,फॅब इंडिया इंजिनियर्स, एएस अँग्री एक्वा एलएलपी, अलटेक अँलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऍक्युशार्प कटिंग टूल्स प्रायव्हेट लिमिटेड, सुपर मीटिंग एशियन एस ई कुपरं मॅटिंग,एशियन मशीन टूल प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्यांची पॅकेजिंग प्रॉडक्ट मशिनरी, कटिंग टूल मॅन्युफॅक्चरर, सेंटरलाइस कुलिंग सिस्टिम, सीएनसी लेथ मशीन मॅन्युफॅक्चरर,फाउंड्री केमिकल मॅन्युफॅक्चरर ,व्हॅपिंग मशीन, इंडस्ट्रियल पाईप, सोलर, मल्चिंग फिल्मस, इंडस्ट्रियल बॉक्सेस, एअर कॉम्प्रेसर,केमिकल इंजीनियरिंग एनालिसिस, इलेक्ट्रॉनिक अँड इकॉनोमिकल स्केल इलेक्ट्रॉनिक वेट मशीन, आदीसह आणि उत्पादने पहावयास मिळणार आहेत.या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर, एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूर
इंजीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर आदींचे सहकार्य मिळाले आहे. रिलायन्स पॉलिमर्स प्रदर्शनाचे स्पॉन्सर आहेत.हाऊस ऑफ इव्हेंट सुजित चव्हाण यांनी या प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.