स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधनp
मुंबई : स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले.त्या ९२ वर्षांच्या होत्या. सकाळी ८.१२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले, भाऊ हृदयनाथ, रश्मी उध्दव ठाकरे, सुप्रिया सुळे, मधुर भांडारकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह त्यांच्या प्रक्रुतीची विचारपूर्वक करण्यासाठी सायंकाळपासून अनेक नामवंतांची रिघ लागली होती. पार्श्वगायिका लता मंगेशकर उर्फ ‘दीदी’ (वय ९२) यांची प्रकृती शनिवारी दुपारी बिघडली. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.लता मंगेशकर यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. लता मंगेशकर आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, आयसीयूमध्ये उपचार घेत होत्या.दोनच दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आला होता.८ जानेवारी रोजी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २७ जानेवारी रोजी सुधारणा दिसून आल्याने त्यांचा व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला होता.काल पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.लता मंगेशकर यांचा जन्म: सप्टेंबर २८, इ. स. १९२९ रोजी झाला होता. भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका आहेत. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.