लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने व्हेंटिलेटरवर
मुंबई : जगविख्यात गायिका लता मंगेशकर, ‘दीदी’ आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. लता मंगेशकर यांची प्रकृती आज बिघडली असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आठ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आला होता.८ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी त्यांचा व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आला होता. डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली त्या आहेत. लता मंगेशकर (वय ९२) यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.त्यांनी कोरोना वर मात केली आहे पण आज त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने आज त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.