आंबा घाटात ३०० फूट खोल दरीत स्विफ्ट गाडी कोसळली कोल्हापुरातील एक जागीच ठार
कोल्हापूर /प्रतिनिधी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात कठडा तोडून सुमारे ३०० फूट खोल दरीत स्विफ्ट गाडी कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात चालक जागीच ठार झाले.हा अपघात विसावा पॉइंट नजीक झाला. या अपघातात संजय गणेश जोशी (६३, राजारामपुरी, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, चालक संजय जोशी हे स्विफ्ट गाडी क्र-(MH09-D1099) घेवून कोल्हापूर वरून रत्नागिरीच्या दिशेने आज सकाळी जात होते. आंबा घाटात रस्त्याचा अंदाज न आल्याने विसावा पॉइंट नजीक गाडी कठडा तोडून ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चालक जोशी यांचा जागीत मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच साखरपा दुरक्षेत्रचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. साखरपा पोलिस, राजू काकडे हेल्प अकॅडमी, आंबा येथील स्थानिक तरुणांच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विद्या पाटील, सचिन भुजबळराव, संदीप जाधव, हेमा गोतवडे, अपर्णा दुधाने, राहुल गायकवाड, किशोर जोयशी, वाहतूक शाखा एपीआय अमरसिंग पाटील व टीम, आदी कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते.