५ लाखाची लाच स्विकारताना राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडले,कोल्हापूरमधील सर्वात मोठी कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रशर व्यवसाय बंद करण्यासाठी दिलेल्या नोटीसा कारवाई न करता मागे घेण्यासाठी ५ लाख ५० हजार रुपयाची लाच स्विकारताना राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजीत बबनराव प्रधान ( वय ४०) सध्या प्लाॅट नंबर ३०३” सी विंग न्यू पॅलेस जवळ’ कोल्हापूर याला आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे पकडले.कोल्हापूर मधील एसीबीची ही आज पर्यंतची मोठी कारवाई आहे.तक्रारदार यांचे क्रशर व्यवसाय असून तो बंद करण्यासाठी ग्रामपंचायत फराळे व उपविभागीय आधिकारी राधानगरी ‘कागल यांनी नोटीस दिल्या होत्या.या नोटीसीप्रमाणे कारवाई न करता नोटीसा परत घेण्यासाठी फराळे गावचे सरपंच ङवर यांनी स्वतासाठी १ लाख रूपये व प्रांताधिकारी यांच्यासाठी १० लाख रूपये लाचेची मागणी केली होती प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांनी सरपंच ङवर याना लाच मागण्यास सांगितले.व त्या लाचेची रक्कम सरपंच ङवर यांच्याकङे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे सरपंच ङवर यांनी लाच रक्कमेतील पहिला हप्ता म्हणून ५ लाख ५० हजार रूपये लाच स्विकारतानां प्रांताधिकार्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकङले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक आधिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि नितीन कूंभार” पो.हे.काँ अजय चव्हाण” पो .हे. शरद पोरे” पो.काॅं रूपेश माने”पो.ना. नवनाथ कदम आदीनी केली.