गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाचा समारोप; नागरिकांचा उदंड प्रतिसाद
कोल्हापूर/प्रतिनिधी: गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे पुष्पप्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. फ्लॉवर शोचे मुख्य आकर्षण असलेला फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांचा ‘बोटॅनिक फॅशन शो’ आणि ‘मॅनी क्वीन डिस्प्ले स्पर्धा सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती.या फॅशन शो ने रसिकांची मने जिंकली. स्पर्धेत प्रथम पारितोषिक इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर फॅशन डिझायनिंग यांनी पटकावले. तर द्वितीय व तृतीय क्रमांक सायबर कॉलेजने मिळविला. याचबरोबर खुल्या गटातील चित्रकला स्पर्धा पार पडल्या.दुपारच्या सत्रात मास्टरशेफ पद्मा पाटील यांचे ‘फ्रुट कार्व्हिंग’ आणि टेक्स्टाईल डिझायनर तेजल देशपांडे यांची ‘नॅचरल डाय’ ची कार्यशाळा संपन्न झाली.या वर्षी सर्व स्पर्धा इकोसिस्टिम रिस्टोरेशन या संकल्पनेवर आधारित होत्या. उद्यानाविषयी निगडित अनेक वस्तूंचे स्टॉल तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील अतिशय कलात्मक मातीच्या वस्तू, टेराकोटा ज्वेलरी, हायड्रोफोनिक्स, सेंद्रिय खते, बागेसाठी उपयुक्त अशा अनेक विविध वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे तसेच नर्सरीच्या स्टॉलवर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी अध्यक्षा कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम,सचिव पल्लवी कुलकर्णी, डॉ.धनश्री पाटील, शैला निकम,वर्षा वायचळ, सुभाषचंद्र अथणे, अशोक डुनुंग ,संगीता कोकितकर, दीपा भिंगार्डे,सीमा सरवदे,सुप्रिया काळे,प्राजक्ता चरणे,स्मिता पाटील आदि उपस्थित होते.सूत्रसंचालन सुप्रिया भस्मे यांनी केले.