ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ केडीसीसीवर बिनविरोध
कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ बयांची केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. कागल तालुका विकास सेवा संस्था गटातून त्यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी श्री. अरुण काकडे यांनी मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांना बिनविरोध घोषित केले. त्याबद्दल पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राजेश लाटकर, संभाजीराव भोकरे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांचा सत्कार झाला.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफसाहेब म्हणाले, “गेली सहा वर्ष बँकेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेतलेली गरुडभरारी लौकिकास्पद आहे. शेतकरी सभासदांच्या विश्वासाचे फलित म्हणजे माझी बिनविरोध झालेली निवड आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत राहू.”