नो मर्सी ग्रुपचा १४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते श्री ऋतुराज श्रीरसागर यांच्या संकल्पनेतून दि.०४ डिसेंबर २००७ साली स्थापन केलेल्या नो मर्सी ग्रुपचा १४ वा वर्धापन दिन आज कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी युवा नेते आणि या ग्रुपची कमान सांभाळत असलेले श्री.पुष्कराज शिरसागर,नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष रोहन घोरपडे आदी उपस्थित होते यावेळी श्री.शुभम घोरपडे यांची नो मर्सी ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. युवकांचे संघटन करून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवून सामाजिक आणि विधायक कार्यासाठी नो मर्सी ग्रुप नेहमी अग्रेसर असतो.युवा नेते श्री.ऋतुराज क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या या ग्रुपचे प्रथम अध्यक्ष म्हणून श्री. अक्षय पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून श्री.अजिंक्य पाटील यांनी आपली जबाबदारी २०१४ पर्यत सक्षमपणे पार पाडली.नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण,हिवाळ्यामध्ये गरीब व गरजू व्यक्तींना चादरीचे वाटप,जनावरांना चारा वाटप,शहरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने या ग्रुपमधील सदस्य कार्यरत असतात.संस्थापक श्री.ऋतुराज क्षीररसागर व या ग्रुपची सद्या कमान सांभाळणारे युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त या ग्रुपकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.नो मर्सी ग्रुपच्या वतीने दरवर्षी फ्रेन्डशिप डे व टडीशनल डे उत्साहात साजरा केला जातो.
२०१४ साली या ग्रुपच्या संघटनात्मक झालेल्या फेररचनेमध्ये अध्यक्ष म्हणून श्री.रोहन घोरपडे आणि उपाध्यक्ष म्हणून श्री.हर्ष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.नव्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्यांनी देखील युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले.यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण,हिवाळ्यामध्ये गरीब व गरजू व्यक्तींना चादरीचे वाटप,जनावरांना चारा वाटप,शहरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,कोविड १९ मध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करणे अशा सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री-राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ काळात गरीब व गरजू नागरिकांना भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू मदत वाटपात सहकार्य करणे,कोविड १९ रुग्णांना रेमिडीसिवीरची कमतरता भासल्यास त्याची उपलब्धता करून देणे,कोविड १९ काळात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करणे,विशेषत २०१९ आणि २०२१ मध्ये कोल्हापूर शहरावर ओढविलेल्या अस्मानी महापूर संकटामध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात नो मर्सी ग्रुपचा मोठा वाटा आहे.
या १४ व्या वर्धापनदिनी श्री.शुभम घोरपडे यांची नो मर्सी ग्रुप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी युवा नेते श्री.पुष्कराज क्षीरसागर आणि या ग्रुपचे अध्यक्ष श्री.रोहन घोरपडे यांनी नूतन उपाध्यक्ष श्री.शुभम घोरपडे यांचा सत्कार केला. श्री.पुष्कराज क्षीरसागर यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी नो मर्सी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.या वर्धापन दिनी ओमिक्रोन या नवीन कोविड १९ विषाणूचा संसर्ग कोल्हापूर वर ओढवू नये, यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरावेत,सामाजिक सुरक्षित अंतर राखावा आणि लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे,असे आवाहन केले.