हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन…?? युवासेनेचा केंद्र शासनास सवाल
शहरातून सायकल रॅलीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध
कोल्हापूर/प्रतिनिधी : सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना “अच्चे दिन” दाखविण्याचे वचन दिले होते. पण, निवडणुकीनंतर “चुनावी जुमला” म्हणत तमाम भारत वासियांना महागाईच्या खाईत ढकलले आहे. देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना, पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे चालू आहेत. हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन? असा सवाल करीत आज पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहर युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला. पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांनी राज्यभरातील युवासैनिकांना इंधन दरवाढीचा निषेध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार युवा सेना कोल्हापूर शहरच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथून या रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “युवासेना जिंदाबाद”, “पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेबांचा विजय असो” “पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो”, “मोदी सरकार हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी, देशात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे. भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना त्यात दर दिवशी आणखी वाढ करत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. याचा रोष विविध माध्यमाव्दारे व्यक्त केला जात असतांनाही केंद्र सरकार यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही म्हणून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारविरूध्द राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेवून, जनतेच्या मनातील रोष ओळखून केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही श्री.ऋतुराज क्षीरसागर यांनी केली.
शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथून सुरु करण्यात आलेली सायकल रॅली सोन्या मारुती मंदिर चौक, राजर्षि शाहू महाराज समाधी स्थळ, सीपीआर चौक, दसरा चौक, अयोध्या टॉकीज चौक, बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येवून सांगता करण्यात आली.यावेळी युवा सेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते, युवासेना जिल्हा समन्वयक योगेश चौगले, हर्षल सुर्वे, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, शहर समन्वयक शैलेश साळोखे, आयटीसेना शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी, कपिल सरनाईक, दादू शिंदे, सचिन मांगले, कपिल पोवार, कृष्णा लोंढे, अक्षय खोत, आदर्श जाधव, विनायक मंडलिक, ओंकार यादव, शक्ती मोहिते, समरजीत मोहिते, अक्षय बोडके, विनायक नलवडे आदी युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.