अखेर.. आखरी रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा संपलीभागातील नागरिकांकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील प्रमुख वर्दळीचा असलेला आखरी रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. या कामाची लवकरात लवकर पूर्तता व्हावी याबाबत भागातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याबाबत स्थानिक नागरिकांसह मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, रियाज बागवान, निलेश हंकारे आदींनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी केली होती. यावर निधी मंजूर असून, तात्काळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करा असा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर महापालिका प्रशासनास दिल्या. अखेर.. आखरी रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा संपली, अण.. रस्त्याच्या कामास मुहूर्त लागला. आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आखरी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गेले ५ ते ७ वर्षापासून या आखरी रस्त्याचे काम रखडले गेले होते. प्र.क्र.२९, ३० व ५० अंतर्गत पंचगंगा हॉस्पिटल (मारुती मंदिर) ते जामदार क्लब पंचगंगा रोड पेव्हर पद्धतीने रस्ता डांबरी करणे, या कामास रु.२३ लाख ८८ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे कामास सुरुवात झाल्याने आणि मा.नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्याचे नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेबांचा काल कोल्हापूर दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी तातडीने रंकाळा तलाव सुशोभिकरणास रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला. राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, नगरविकास मंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शहरवासियांना मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असेल. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनाच शहराचा विकास करून दाखवेल, असा विश्वासही श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
यावेळी वर्षानुवर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामास सुरवात केल्याबद्दल प्र.क्र.२९, ३० व ५० मधील नागरिकांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भागातील नागरिकांनी मा.नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यासह आखरी रस्ता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले.
यावेळी मा.महापौर सौ.सरिता मोरे, मा.महापौर माधवी गवंडी, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, मा.नगरसेवक प्रकाश गवंडी, मा.नगरसेवक किरण शिराळे, रियाज बागवान, निलेश हंकारे, मा.परिवहन सभापती उदय जगताप, विठ्ठल ओतारी, मोहन ओतारी, दीपक लिंगम, राकेश पोवार, जयराज ओतारी, जहांगीर अत्तार, किरण मांगुरे, प्रदीप कोंडेकर, उदय जाधव, नितीन साळी, सुशांत पोवार, बबलू साठम, सुनील घाग, संग्राम मोरे, शेखर रणसिंगे, महेश कामत, साबीर उस्ताद, भिकशेठ कदम, विक्रम ठमके, जयराज ओतारी, राहुल ओतारी, शीतल पवार, उषा काटकर, सुनिता भोसले, पुष्पा काटकर, संगीता लिंगम, करुणा ओतारी, संगीता माने, स्नेहाली ओतारी आदी प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.