Friday, December 20, 2024
Home ताज्या संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍सकडून सिग्नियासोबत सहयोगाने कोल्‍हापूरमध्‍ये हिअरिंग क्लिनिकचे उद्घाटन

संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍सकडून सिग्नियासोबत सहयोगाने कोल्‍हापूरमध्‍ये हिअरिंग क्लिनिकचे उद्घाटन

संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍सकडून सिग्नियासोबत सहयोगाने कोल्‍हापूरमध्‍ये हिअरिंग क्लिनिकचे उद्घाटन

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍स या मुंबईतील हिअरिंग क्लिनिक्‍सच्‍या प्रख्‍यात साखळीने सिवेन्‍टोस इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडसोबत सहयोगाने कोल्‍हापूर येथे शॉप नंबर ५, श्री सिद्धिविनायक अपार्टमेन्ट , सी टी सी नंबर २३३, प्लॉट नंबर १२ व १३, सर्व्हे कॉलनी , ताराबाई पार्क, इ वॉर्ड, कोल्हापूर ४१६००३ अत्‍याधुनिक केंद्राचे उद्घाटन पद्मश्री सय्यद किरमाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री किशालया चक्रवर्ती , श्री पियुष जैन , श्री अविनाश पवार , श्री कुमार वासानी , सौ रुपाली वासानी आणि श्री रोहित छाब्रा हे उपस्थित होते. हे अत्‍याधुनिक केंद्र आधुनिक काळातील हिअरिंग केअर केंद्राचे प्रतिरूप आहे, जे श्रवणदोषासाठी दर्जात्‍मक हिअरिंग केअर सोल्‍यूशन्‍स देते.
कोल्‍हापूरमधील संस्‍कारा केंद्र ऑडिओमेट्री, टायम्‍पेनोमेट्री व ओएई यासारख्‍या व्‍यापक ऑडिओलॉजिकल सेवांसोबत हिअरिंग एड ट्रायल अॅण्‍ड फिटिंग, हिअरिंग एड प्रोग्रामिंग, सर्विसिंग, स्‍पेअर्स व अॅक्‍सेसरीज इत्‍यादी सारख्‍या सुविधा देखील देईल. कोणत्‍याही व्‍यक्‍तीला कोणत्‍याही वयामध्‍ये श्रवणदोषाचा त्रास होऊ शकतो, म्‍हणूनच या आजाराकडे त्‍वरित लक्ष देणे गरजेचे आहे. संशोधनातून निदर्शनास येते की, भारतात ६ टक्‍के लोकांना कोणत्‍या-ना-कोणत्‍या प्रकारचा श्रवणदोष आहे आणि याकडे दुर्लक्ष केल्‍यास भौतिक व सामाजिक स्थिती खालावली जाऊ शकते.सिवन्‍टोस इंडिया प्रा. लि. चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश पवार म्‍हणाले की सिवन्‍टोस इंडियाला कोल्‍हापूरकरांना साऊंड क्‍वॉलिटी व कनेक्‍टीव्‍हीटी देण्‍याचा आनंद होत आहे. ज्‍यामुळे युजर्सना त्‍यांच्‍या वैयक्तिक श्रवण अनुभवावर उत्तम नियंत्रण ठेवता येईल. आम्‍ही सातत्‍याने नवीन तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍ससोबत प्रगत डिजिटल उत्‍पादने सादर करत आहोत, जे युजरला त्‍यांच्‍या गरजांशी सानुकूल असा उच्‍च दर्जाचा श्रवण अनुभव देतात. हे नवीन हिअरिंग एड सोल्‍यूशन हिअरिंग हेल्‍थ केअर व्‍यावसायिकांना आधुनिक युजरच्या व्‍यस्‍त वेळापत्रकाशी अनुरूप सुविधांची उत्तमरित्‍या पूर्तता करण्‍यामध्‍ये आणि त्‍यांच्‍या रूग्‍णांसोबतचे नाते अधिक दृढ करण्‍यामध्‍ये मदत करते
पद्मश्री सय्यद किरमाणी म्‍हणाले की श्रवणदोष कोणालाही आणि कोणत्‍याही वयामध्‍ये होऊ शकतो. पण यामुळे कोणीही सामान्‍य जीवन जगण्‍यापासून वंचित राहता कामा नये. नवीन तंत्रज्ञान-सक्षम सिग्निया श्रवणयंत्र अशा लोकांची श्रवण क्षमता वाढवू शकतात आणि त्‍यांना त्रासमुक्‍त जीवन जगण्‍याचा आत्‍मविश्‍वास देऊ शकतात.
संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍सचे संचालक श्री. कुमार वासानी म्‍हणाले की कोल्‍हापूरमध्‍ये केंद्राचे उद्घाटन हे आजच्‍या काळातील सर्व वयोगटातील युजर्सच्‍या वाढत्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण हिअरिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आणखी एक पाऊल आहे. संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍सचे मुंबई व कोल्‍हापूरमध्‍ये ४ अत्‍याधुनिक हिअरिंग क्लिनिक्‍स आहेत. संस्‍कारामध्‍ये पात्र ऑडिओलॉजिस्‍ट्स लक्षणे, चिन्हांची तपासणी करण्‍यामध्‍ये मदत करतील, चाचण्‍या करतील आणि सोल्‍यूशन्‍स देतील, ज्‍यामुळे श्रवणदोष अधिक वाढण्‍याला प्रतिबंध होण्‍यासोबत लोकांना उत्तमरित्‍या संवाद साधण्‍यास मदत होईल. श्रवणदोषाचे लवकर निदान झाले पाहिजे आणि त्‍याचे घातक परिणाम टाळत उत्तम निष्‍पत्तींसाठी त्‍वरित उपचार केले पाहिजेत. आमचा आमच्‍या सर्व श्रवणयंत्रांचा वापर करणा-या ग्राहकांना जागतिक दर्जाचे हिअरिंग सोल्‍यूशन्‍स, तसेच विक्री-पश्‍चात्त सेवा देण्‍याचा मनसुबा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments