गोकुळ दूध विक्रीचा नविन उच्चांक एक दिवसात १५ लाख १४ हजार लिटर्स दूध विक्री कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. चेअरमनसो यांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) च्या इतिहासात दूध विक्री मध्ये दि.१३/१०/२०२१ इ.रोजी नविन उच्चांक नोंद केल्या बद्दल आज संघाच्या ताराबाई पार्क कार्यालामध्ये कर्मचाऱ्याच्या वतीने संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गोकुळने एक दिवसाच्या दूध विक्रीचा नविन उच्चांक प्रस्तापीत करतांना १५ लाख १४ हजार ५७१ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे ही विक्री सणासुदीची नसुन दैनंदिन विक्री आहे.
यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जिल्हाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळ व्यवस्थानाचे अभिनंदन केले. पुढे बोलताना चेअरमन विश्वास पाटील यांनी विक्रीमध्ये नविन मानदंड प्रस्तापीत करतांना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तीतकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासहार्ततेवर साध्य करू. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, दुधसंस्था ग्राहक वितरक,कर्मचारी व वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे असल्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्यावतीने धन्यवाद देतो. असे चेअरमन श्री.पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी जेष्ठ संचालक अरुण डोंगळे बोलताना म्हणाले भविष्यात जास्तीत जास्त म्हैशीच्या दूध उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे . म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दूध उत्पादकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा देण्यावर भर दिला पहिजे. संघाच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढावी यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे. यावेळी स्वागत डॉ. प्रकाश दळवी यांनी केले व आभार वरिष्ठ दूध संकलन अधिकारी धनाजी पाटील यांनी मानले.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे , संचालक बयाजी शेळके, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील वित्त व्यवस्थापक एच.एम.कापडिया, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु. व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, कामगार संघटनेचे शंकर पाटील, शाहीर निकम, डॉ. साळुंके, डॉ. गायकवाड, दत्ता वाघरे, संभाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अधिकारी व कर्मचारी अदी उपस्थित होते