नविद मुश्रीफ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे संचालक व कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते मा.श्री.नविद मुश्रीफ साहेबांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त नविद मुश्रीफ युवा अधिष्ठान मार्फत करनूर – वंदूर येथील वृद्धाश्रमास तांदूळ, आटा, तेल व जीवनावश्यकचे साहित्य देण्यात आले. यावेळी सर्व वृद्धाश्रमातील असलेल्या वृद्धांना साड्या देण्यात आल्या.
यावेळी कागल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी, अमोल डोईफोडे, तुषार भास्कर, मुकेश मठूरे, अमित पिष्टे, निहाल जमादार, मोहसिन मुल्लाणी, सतीश डोईफोडे, मुनीर मुल्ला, ऋषिकेश चव्हाण, राजू राजपूत, संतोष संकपाळ, राजू नायकवडी, सुरज कांबळे, नागसेन कांबळे व युवा अधिष्ठानचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.