किरीट सोमय्याच्या विरोधात दाव्यासाठी कागल शहरातून २५ लाख रुपये -माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर
रविवारी होणार मंत्री मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत
या बैठकीत किरीट सोमय्या यांचा केला जाहीर निषेध
कागल /प्रतिनिधी : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे . यासाठी न्यायालयात ठरावीक रक्कम भरावी लागणार आहे . त्यासाठी आम्ही कागलकर पंचवीस लाख रूपये गोळा करून मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत असे प्रतिपादन कागल शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केले.रविवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस टी स्टँड कागल येथे मंत्री मुश्रीफ यांचे जल्लोषात स्वागत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आज कागल येथील छत्रपती शाहू मेमोरियल हॉल येथे बोलविण्यात आलेल्या महा विकास आघाडी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कागल शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व तरुण मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व विविध संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.* *यावेळी सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्याचा समाचार घेत त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कागल शहराचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक प्रवीण काळबर, पक्षप्रतोद नितीन दिंडे, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नगरसेवक सतीश घाटगे, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नगरसेविका मोरबाळे वहिनी, नगरसेविका गुरव वहिनी, नगरसेविका अल्का मर्दाने, नगरसेवक बाबासाहेब नाईक, नगरसेवक आनंदा पसारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नवले बोते, नगरसेवक सौरभ पाटील, कागल शहर महिला अध्यक्ष भालबर वहिनी, सुषमा पाटील, प्रकाश नाळे, संग्राम लाड,पंकज खलीप,सागर गुरव, बच्चन कांबळे, गंगाराम शेवडे,शेहनाज आत्तार, संजय फराकटे, शामराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.