मनपा शिक्षक सेवक पतसंस्थेने स्वतःची वास्तू उभी केली हे कौतुकास्पद आहे: माननीय सतेज उर्फ बंटी पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने स्वतःची वास्तू उभी केली ही बाब कौतुकास्पद असून 58 वर्षाच्या इतिहासात गौरवास्पद कामकाज केले आहे असे उद्गार पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी इमारत उद्घाटन प्रसंगी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयफ़ेटोचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते.माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील पुढे म्हणाले सहकारी बॅंका पतसंस्था टिकल्या तरच सर्वसामान्यांना अडचणीच्या वेळी मदत होऊ शकते त्यामुळे आपण सर्वांनी मिळून सहकारी संस्था टिकवल्या पाहिजेत . मनपा शिक्षक पतसंस्था ९.७५ % दराने कर्जपुरवठा करते ही बाब विशेष दखल घेण्यासारखी असून काटकसरीने कारभार करून एक चांगली सुसज्ज सर्व सोयींनीयुक्त इमारत उभी केली .त्याबद्दल सर्व संचालकांचे अभिनंदन केले.यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल कौतुक करून एक चांगली वास्तू उभी केल्याबद्दल संचालकांचे कौतुक करून शिक्षकांच्या सदैव पाठीशी उभे राहत असल्याचे सांगितले. आमदार चंद्रकांत जाधव यांनी संस्थेने व्यापारी दृष्टिकोनातून विचार करून आर्थिक उलाढाल वाढवावी उत्पन्न वाढीचे मार्ग तयार करावेत असे सांगितले. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षकांच्या प्रश्नात मंत्रीमहोदयांनी लक्ष घालावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी नपा मनपा शिक्षकांचा १००% वेतनाचा प्रश्न सोडवावा व महापालिकेवरील आर्थिक ताण कमी करावा असे विचार मांडले. यावेळी संस्थेच्या इमारत उभारणीत योगदान दिलेल्या संचालकांचा , कर्मचाऱ्यांचा,माजी सभापती, उपसभापती,सेक्रेटरी या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सभापती संजय पाटील यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे मानद चिटणीस सुधाकर सावंत यांनी केले. याप्रसंगी उमेश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी संस्थेचे मुख्य प्रवर्तक बाबा यादव ,दुर्वास कदम,वसंत चव्हाण, उपायुक्त रविकांत अडसूळ,प्रशासनाधिकारी एस.के. यादव,जगमोहन भुर्के,राज्याध्यक्ष भरत रसाळे,शिक्षक नेते कृष्णात कारंडे,दादा लाड,राजू परीट, महादेव डावरे,वसंत आडके ,उत्तम गुरव उपसभापती मनोहर शिंदे, आशालता कांजर सरिता सुतार आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत सभापती संजय पाटील, प्रस्ताविक सुधाकर सावंत, आभार प्रदर्शन संजय कडगावे ,सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले