पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी धर्मवीर संभाजीराजे स्मारक, पापाची तिकटी, कोल्हापूर.
येथे सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान व संभाजी राजे स्मारक प्रेमी, यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (तुळापूर, जिल्हा पुणे) येथील समाधी स्थळावरील पादुकांना पंडित पवार व नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते यावेळी विधिपूर्वक पादुका स् अभिषेक करण्यात आला.
या वेळी छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्यास ऋतुराज क्षीरसागर व उपायुक्त दरेकर मॅडम मोहन सूर्यवंशी जनसंपर्क अधिकारी तसेच इंजिनियर रणजीत निकम शिवानंद बनसोडे यांच्या वतीने हार घालून पूजन करण्यात आले. शहरात कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे जनता कर्फ्यू लागू केलेला आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोनाचे नियम पाळून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी स्मारकाची रंगरंगोटी फुलांची आरास व विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला.
या कार्यक्रमास स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीराम जाधव, सह्याद्री शिलेदार चे अध्यक्ष अभिजीत सूर्यवंशी, उमेश पवार, विशाल शिंदे, फिरोज सत्तारमेकर, वैभव भोसले, ओंकार शिंदे, रत्नदीप चोपडे, मोहन माजगावकर, देवेंद्र भोसले, अशितोष सूर्यवंशी, संदीप सुर्वे आणि शिवप्रेमी व शंभू प्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे पौराहित्य रायगड येथील पुजारी दादा महाराज राशिवडेकर यांनी ऑनलाइन येऊन केले.