शववाहिका चालकांसाठी २००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची गणी आजरेकर यांच्याकडून सोय
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगपालिकेच्या शववाहिका चालक दिवस-रात्र, कोवीड व नॉन कोवीड सेवा देत आहेत. परवा रविवार पेठेत एका मयत साठी शववाहीका आलेली असताना,चालक तहानलेला होता,पाण्यासाठी त्याने शववहिका रस्त्या शेजारी लाऊन एका घरातून पाणी घेतले. हि गोष्ट गणिभाई आजरेकर यांच्या कानावर पडली लगेचच त्यांनी नियोजन लाऊन शिवजयंती चे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिकेचे शववाहिका चालकांसाठी २००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या व संभाजी ब्रिगेड कोविड केअर सेंटर ,गिरगाव ला तांदूळ, चटणी, व भाजीपाला देण्यात आली. या उपक्रमासाठी उद्योगपती गिरीश शाह,उद्योगपती दादा शेख चटणी वाले ,मार्केट यार्ड मधील बाबुराव कांदेकर, सहीर बागवान (BKB), इर्शाद बागवान (HKB) व आजरेकर फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले. या वेळी अश्किन आजरेकर ,शौकत बागवान, विशाल शिंदे, किरण नरके,विकी पंडत, अक्षय भुजुगडे व अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.