Saturday, January 11, 2025
Home ताज्या नाबार्डचे नंदू नाईक यांना डेप्युटी जनरल मॅनेजरपदी बढती,कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारीपदी आशुतोष...

नाबार्डचे नंदू नाईक यांना डेप्युटी जनरल मॅनेजरपदी बढती,कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारीपदी आशुतोष जाधव यांची नियुक्ती

नाबार्डचे नंदू नाईक यांना डेप्युटी जनरल मॅनेजरपदी बढती,कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारीपदी आशुतोष जाधव यांची नियुक्ती

कोल्हापूर/प्रतिनिधी : नाबार्डचे कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांना बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची बदली कोल्हापुरातून भोपाळमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर झाली आहे. नाबार्डच्या भोपाळमधील मध्यप्रदेश विभागीय कार्यालयात ते रुजू होणार आहेत. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारी म्हणून आशुतोष जाधव यांची नियुक्ती झाली आहे.
श्री. नाईक यांनी सहा वर्षांच्या कोल्हापुर जिल्ह्यातील कारकीर्दीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी दुग्धव्यवसाय, कुकुटपालन तसेच इतर योजनांसाठी भरघोस योगदान दिले आहे.जिल्ह्याचा २०१५-१६ सालचा वार्षिक पतपुरवठा सहा हजार, ६०० कोटी रुपये होता. त्यामध्ये २०२१-२२ सालाकरिता ११ हजार, १०० कोटी इतकी भरघोस वृद्धी झाली आहे. बँकांच्या जिल्हा व तालुकस्तरीय बैठकामध्ये सहभाग घेऊन कृषि क्षेत्रासह प्राथमिक क्षेत्रासाठी पतपुरवठा वाढविण्यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केले आहेत. कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्येही त्यांनी मोलचे योगदान दिले आहे.दरम्यान, आशुतोष जाधव यांनी यापूर्वी छत्तीसगढ़, राजस्थान आणि मुंबई येथील नाबार्ड मुख्यालयात सहाय्यक महाप्रबंधक या पदावर काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments