Sunday, December 22, 2024
Home ताज्या आमची आघाडी गोकुळ उत्पादकांच्या हितासाठी टँकर वाचविण्यासाठी नाही - पालकमंत्री सतेज पाटील

आमची आघाडी गोकुळ उत्पादकांच्या हितासाठी टँकर वाचविण्यासाठी नाही – पालकमंत्री सतेज पाटील

आमची आघाडी गोकुळ उत्पादकांच्या हितासाठी टँकर वाचविण्यासाठी नाही – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेट्टी यांच्या बाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचे म्हटले. शिवाय अशोक चराटी यांनीही काल (बुधवार) सत्ताधारी गटासोबत असल्याचे जाहीर केले. याबाबत विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, चराटी यांच्यावर काही स्थानिक राजकारणामुळे दबाव टाकला असावा. शिवाय त्यांनी सुरुवातीला जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहतील, अशी खात्री असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले.
धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारणात शोधूनही सापडणार नाही, असेही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका भाषणात आमचा एकही टँकर गोकुळमध्ये नाही, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पुराव्यासह त्यांना दाखवून दिले आहे. यामुळे त्यांचा हा खोटा चेहरा जनतेसमोर आला असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले. शिवाय आमची अभद्र युती म्हणत आहात मात्र, आम्ही दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. टँकर वाचवायला आम्ही एकत्र आलो नाही तर तुम्हीच तुमचे टँकर वाचवायला तिथे बसला आहात, असे प्रत्युत्तर यावेळी सतेज पाटील यांनी दिले.
१ हजार मते घेऊन आम्ही विरोधात आलोय, त्यामुळे काल सत्ताधारी आघाडीच्या पत्रकार परिषदेत वाढवलेल्या सभासदांमुळे आमचा ४०० मतांनी विजय होईल, असे म्हटले होते. याबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, वाढीव सभासदांचे विश्लेषण अगदी साधे आहे. त्यांचे ४ संचालक आमच्याकडे आले, शिवाय आम्ही राष्ट्रवादीचे ५०० ते ६०० मते अशी जवळपास १ हजार मते घेऊन आम्ही विरोधात आलो आहे. आमचाच १ हजार मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सुद्धा व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments