कोल्हापूरातील गांधीनगर येथे केळी विक्रेत्या महीलेचा ङोक्यात दगङ घालून अज्ञाताने केला खून
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या गांधीनगर मेन रोडवरील उचगाव हद्दीतील एलजी शोरूम समोर मनाडे मळा कॉर्नर येथे एका इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या केळी विक्रेत्या महिलेचा डोक्यात दगड घालून अज्ञाताने खून केल्याचे समोर आले आहे. आज (दि. २७) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
अधिक माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी एका वॉचमनच्या ओळखीने मनाडे मळा कॉर्नर येथील एका इमारतीमध्ये केळी विक्रेती महिला राहण्यासाठी आली. तिच्याकडे एका पुरुषाचं येणं-जाणं होत. गेल्या आठवड्यातच या महिलेचा गोकुळ शिरगाव परिसरात वाद झाला होता. त्यानंतर ती मनाडे मळा कॉर्नर येथील एका इमारतीमध्ये राहण्यासाठी आली. तिचे नाव मंजुळा असून ती मूळ कर्नाटकातील असल्याची चर्चा घटनास्थळी होती. अनैतिक संबंधांमधून हा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी पोलिस पथके नेमण्याच्या सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आल्या. त्यातील एक पथक निपाणीकडे रवाना झाल्याचे समजते.