ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरातील रक्तदान शिबिर मध्ये २१० बाटल्यांचे रक्तसंकलन
कागल/प्रतिनिधी : कागल शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २१० रक्तदात्यांनी रक्तदान केले . ग्राम विकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त या विधायक उपक्रमांचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामदार मुश्रीफ फाऊंडेशन व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते. कागल येथील छत्रपती शाहू मेमोरियल हॉल येथे या शिबिराचे आयोजन केले होते.