Sunday, December 1, 2024
Home ताज्या शिवाजी विद्यापीठ ‘अ++’ मिळविणारे देशातील अवघे दुसरे राज्य विद्यापीठ,राष्ट्रीय स्तरावर केवळ सात...

शिवाजी विद्यापीठ ‘अ++’ मिळविणारे देशातील अवघे दुसरे राज्य विद्यापीठ,राष्ट्रीय स्तरावर केवळ सात संस्था ‘अ++’ मानांकित

शिवाजी विद्यापीठ ‘अ++’ मिळविणारे देशातील अवघे दुसरे राज्य विद्यापीठ,राष्ट्रीय स्तरावर केवळ सात संस्था ‘अ++’ मानांकित

कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘नॅक’ (बंगळुरू) यांचेकडून सन २०१८पासून आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर केवळ सात संस्थांना ‘अ++’ मानांकन प्राप्त झाले असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे असे मानांकन मिळविणारे शिवाजी विद्यापीठ अवघे दुसरे राज्य अकृषी विद्यापीठ ठरले आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख यांनी दिली आहे.
डॉ. कामत व देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद (नॅक) यांचेकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये सन २०१८पासून ‘अ++’ मानांकन मिळविणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर केवळ सात उच्चशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये अवघी दोन राज्य विद्यापीठे आहेत. तमिळनाडूमधील मदुराई कामराज विद्यापीठ आणि येथील शिवाजी विद्यापीठ अशा दोन विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. यातील मदुराई कामराज विद्यापीठाचे सीजीपीए गुणांकन ३.५४ इतके आहे, तर शिवाजी विद्यापीठाचे ३.५२ इतके आहे. उर्वरित पाचांत बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) ही एकमेव केंद्रीय संस्था आहे, तर बनस्थळी विद्यापीठ (राजस्थान), रामकृष्ण मिशन विवेकानंद एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (पश्चिम बंगाल), कोनेरु लक्ष्मैय्या एज्युकेशन फाऊंडेशन (आंध्र प्रदेश) आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (चेन्नई, तमिळनाडू) या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत.
गुणवत्तेचा चढता क्रम
शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’च्या चार फेऱ्यांना सामोरे जात असताना सातत्याने आपली गुणवत्ता उंचावत नेल्याचे दिसून येते. सन २००४मध्ये शिवाजी विद्यापीठ पहिल्यांदा नॅकच्या मूल्यांकनास सामोरे गेले, त्यावेळी विद्यापीठास ७७.७५ (ऑन द स्केल ऑफ १००) सीजीपीए गुणांकनासह ‘ब+’मानांकन प्राप्त झाले. सन २००९ साली २.८५ (ऑन द स्केल ऑफ ४) सीजीपीए गुणांकनासह‘ब’ मानांकन प्राप्त केले. सन २०१४मध्ये ३.१६ सीजीपीए गुणांकनासह ‘अ’ मानांकन प्राप्त केले, तर यंदा अधिक चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करीत ३.५२ गुणांकनासह ‘अ++’ मानांकन प्राप्त केले आहे, अशी माहितीही डॉ. कामत यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments